कोल्हापूर उपांत्य फेरीत

By Admin | Published: January 25, 2017 01:03 AM2017-01-25T01:03:07+5:302017-01-25T01:03:07+5:30

राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा : मनाली बागडी उत्कृष्ट खेळाडू

In the semi-finals of Kolhapur | कोल्हापूर उपांत्य फेरीत

कोल्हापूर उपांत्य फेरीत

googlenewsNext


जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय जैन चषक महिला आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत उपउपांत्य फेरीच्या सामन्यात नागपूर- कोल्हापूर- मुंबई व पुणे संघाने विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या संघांमध्ये बुधवारी दुपारी- २.१५ वाजता ३.४५ वाजता उपांत्य फेरीचे सामने होणार आहे.
पहिला उपउपांत्य सामना नागपूर विरुद्ध गोंदीया यात झाला. वेळसंपेपर्यंत कोणताही संघ गोल करू शकला नाही, म्हणून टॉयब्रेकरवर नागपूर संघाने ३-२ ने हा सामना जिंकला. नागपूरची गोलकिपर भुवनेश्वरी पेन्दाम हीस उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला.
दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना नाशिक विरुद्ध कोल्हापूर यात झाला कोल्हापूरची ज्योती ढेरे हिने खेळाच्या सुरुवातीच्या १२ मिनिटात पहिला गोल करून नाशिक संघाला चकमा दिला़ परंतु नाशिकच्या मोना उजागरे हिने १८ व्या मिनिटात परतफेड करीत सामना बरोबरीत केला. अंतिम वेळपर्यंत दोघेही संघ बरोबरीत असल्याने पंचांकडून निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात कोल्हापूरने ४-२ ने हा सामना जिंकला. यामध्ये कोल्हापूरच्या सोनाली साळवी, प्रियांका मोरे, मनाली बागडी, ऋतुजा सूर्यवंशी यांनी गोल केला. कोल्हापूरची मनाली बागडी (गोलकिपर) हीला उत्कृष्ट खेळाडूंचा बहुमान मिळाला.
तिसरा सामना मुंबई विरुद्ध उस्मानाबाद यात झाला. यात पहिला हाफपर्यंत कोणताही संघ गोल करू शकला नाही. परंतु दुसऱ्या हाफच्या ७ व्या मिनिटाला आदिती शेट्टी व २० व्या मिनिटाला सनाया अनुसरीयाने गोल करून मुंबईला २-० ने विजय मिळवून दिला. उस्मानाबादची स्वाती तेलंग हीस उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला.
उपउपांत्य फेरीच्या सामन्यात जळगावच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, स्थायी समिती सभापती डॉ.वर्षा खडके, कांताई नेत्रालयाच्या प्रमुख डॉ.भावना अतुल जैन, शारदा सुभाष चौधरी, लाचलुचपतच्या नीता कायटे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॅशन डिझाईनच्या संचालिका संगीता पाटील, एस.एस. मणियार लॉ कॉलेजच्या प्रा.डॉ. विजेतासिंग, उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील व पुण्याचे होलीस्टीक सॉकरचे विनय मुरगुड यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले.


पुणे संघाने एकतर्फी जिंकला सामना़़़
चौथा उपउपांत्य फेरीचा सामना मात्र एकतर्फी झाला. पुणे संघाने अमरावतीला ११-० ने हरविले. पुणेतर्फे एैश्वर्या जगतापने ३, पूजा वाघरी, पूजा धनकुडे यांनी प्रत्येकी २ तर एैश्वर्या बालापुरे, देवनाशी गाला हिने प्रत्येकी एक गोल केला. तीन गोल करणारी एैश्वर्या जगताप हीस सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला.


गुरूवारचे सामने
दुपारी- २-१५- वाजता पुणे
विरुद्ध कोल्हापूर.
दुपारी- ३-४५- वाजता मुंबई
विरुद्ध नागपूर

 

Web Title: In the semi-finals of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.