कामगार कायद्यावर चर्चासत्र संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:32+5:302021-02-14T04:22:32+5:30
कोल्हापूर : केंद्र शासनाने कामगार कायद्यात बदल व सुधारणा केल्या आहेत. याबाबत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये शनिवारी चर्चासत्र झाले. यामध्ये ...
कोल्हापूर : केंद्र शासनाने कामगार कायद्यात बदल व सुधारणा केल्या आहेत. याबाबत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये शनिवारी चर्चासत्र झाले. यामध्ये ॲड. अभय नेवगी यांनी मार्गदर्शन केले.
कामगार कायद्याबाबत उद्योजक सभासदांना माहिती देणे व शंका, प्रश्न यांचे निरसण करण्यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, स्मॅक, गोशिमा, आयआयएफ, कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स, सीआयआय, मॅक-कागल यांच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होत. ॲड. नेवगी यांनी कारखानदार मालक यांना पाॅवरपाॅइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ ॲण्ड वर्किंग कंडशिन कोड २०२०, सोशल सिक्युरिटी कोड २०२०, तसेच कोड ऑन वेजेस २०१९ आदी नवीन कायद्यांची त्यांनी माहिती दिली. यावेळी उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ॲड. नेवगी यांनी दिली. प्रास्ताविक सचिन शिरगावकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागत अध्यक्ष रणजीत शाह यांनी केले. मानद सचिव दिनेश बुधले यांनी आभार मानले.
श्रीकांत पोतणीस, एम. वाय. पाटील, प्रताप पुराणिक, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, बाबासाहेब कोंडेकर, सोहन शिरगावकर, आर. बी. थोरात, कुशल सामाणी, राजेंद्र डुणुंग, किरण चरणे, संजय पाटील, मोहन पंडितराव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : केंद्र शासनाने कामगार कायद्यात बदल व सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये आयोजित चर्चासत्रात ॲड. अभय नेवगी यांनी मार्गदर्शन केले.
(फोटो-१३०२२०२१-कोल-कामगार)