सत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे शनिवारी परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:22 AM2021-03-18T04:22:48+5:302021-03-18T04:22:48+5:30
अलीकडच्या काळात ऐतिहासिक महामानवांच्या इतिहास लेखनाच्या प्रक्रियेमध्ये घडणाऱ्या घटनांपेक्षा आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या अनेक तत्त्वांच्या अंतर्भाव, तो इतिहास लेखन करणाऱ्या ...
अलीकडच्या काळात ऐतिहासिक महामानवांच्या इतिहास लेखनाच्या प्रक्रियेमध्ये घडणाऱ्या घटनांपेक्षा आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या अनेक तत्त्वांच्या अंतर्भाव, तो इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकार अथवा साहित्यिकांच्या लेखनात होत असल्यामुळे अनेक गंभीर चुका नव्याने उजेडात येत आहेत. येणाऱ्या काळात अशा प्रकारचे प्रसंग टाळायचे असतील तर वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाशिवाय पर्याय नाही याच भावनेतून सत्यशोधक इतिहास परिषद येथून पुढच्या काळात नवीन सत्यान्वेशी इतिहासाच्या मांडणीसाठी कार्यरत होत असल्याचेही प्रा. राजहंस यांनी जाहीर केले. त्याचेच औचित्य साधून शनिवारी सायंकाळी पाच वाजता इतिहासाच्या विकृतीकरणाला जबाबदार कोण? या विषयावर परिसंवाद आयोजित केले असून, त्यासाठी रूपेश पाटील, अमित मेधावी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रबुद्ध कांबळे, प्रियाताई शिरगांवकर, सुनील पाटील, राहुल राजहंस, अनिल म्हमाणे, जावेद मुजावर, आदी उपस्थित होते.