जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सेमिनार
By admin | Published: November 30, 2015 11:22 PM2015-11-30T23:22:22+5:302015-12-01T00:12:34+5:30
‘हिमानी हॅपिनेस हब’च्यावतीने आयोजन
कोल्हापूर : आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट हॅपिनेस व सक्सेस फॉर्म्युला’ या महासेमिनारचे जानेवारी २०१६ मध्ये विभागीय पातळीवर ‘हिमानी हॅपिनेस हब’च्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या महासेमिनारमध्ये जीवनातील विविध पैलूंचे ज्ञान अवगत होणार असल्याची माहिती ‘मार्इंड पॉवर जादूगार’ मिस हिमानी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
हिमानी म्हणाल्या, जीवनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. यामुळे जीवनाचे ध्येय निश्चित करून त्याला प्राप्त करू शकाल तसेच जीवनातील समस्यांवर उपाय शोधू शकणार आहे. जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, सफलता, स्वास्थ्य, संपत्ती आणि आध्यात्मिकता प्राप्त करण्याचे मार्ग शिकाल. या व इतर गोष्टींचे ज्ञान या महासेमिनारमधून मिळणार आहे.
विद्यार्थी विकास प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच मी मार्गदर्शन केले आहे. भारतासह आफ्रिकेमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना याचे प्रशिक्षण दिले आहे. या महासेमिनारसाठी नावनोंदणी या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील चाटे कोचिंग क्लासेसच्या सर्व शाखांवर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नावनोंदणी होणार आहे. त्यासाठी त्वरित संपर्क साधावा. चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे भारत खराटे, जितेंद्र कोले, प्रफुल्ल महाजन उपस्थित होते.