नगरपालिकेच्या अंदाजपत्रकास स्थगितीचा प्रस्ताव पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:44 AM2021-03-04T04:44:27+5:302021-03-04T04:44:27+5:30
इचलकरंजी : नगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये ३२.७६ कोटी रुपयांची वाढ केली आहे. उत्पन्न वाढीसाठी कोणतीही कार्यवाही ...
इचलकरंजी : नगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये ३२.७६ कोटी रुपयांची वाढ केली आहे. उत्पन्न वाढीसाठी कोणतीही कार्यवाही न करता फक्त उत्पन्न वाढीचे बनावट आकडे वाढवून अंदाजपत्रकात जमेच्या बाजूला दाखविले आहेत. हे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर केले असून, त्यास कलम ३०८ नुसार स्थगितीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांना दिले.
निवेदनात, कौन्सिल सभेमध्ये उत्पन्नाबाबत प्रशासनाकडे माहिती विचारली असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. मुळात प्रशासनाने ४१५ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. पुढील वर्षातील खर्चासाठी उत्पन्नामध्ये बोगस वाढ दाखवून खर्चाच्या बाजूचे आकडे वाढविले आहेत. नगरपालिकेकडे मागील वर्षातील ठेकेदारांची बिले, कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्यईटी, फंडाची रक्कम देऊ शकत नसताना पोकळ जमा रक्कम वाढवून अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकास ३०८ प्रमाणे स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे.