‘त्या’ आरोग्य सेविकांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:58+5:302021-09-03T04:24:58+5:30

सभापती रूपाली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन आरोग्य सेविकांना ...

Send a proposal for re-employment of 'those' health workers | ‘त्या’ आरोग्य सेविकांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव पाठवा

‘त्या’ आरोग्य सेविकांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव पाठवा

Next

सभापती रूपाली कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन आरोग्य सेविकांना पुनर्नियुक्ती द्यावी, अशी मागणी तेली यांनी केली.

विजयराव पाटील म्हणाले, सर्व उपकेंद्रावर मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाली आहे. परंतु, प्रतिसादाअभावी लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे गावागावांत वार्डनिहाय प्रबोधन मोहीम राबवून लसीकरणाची उद्दष्टिपूर्ती करावी.

अतिवृष्टी व महापुरामुळे हिरण्यकेशी नदीतील बंधारे आणि लघुपाटबंधारे तलावात वेळूची बेटे, लाकडाची ओंडके व झाडे अडकल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन बंधाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील अडथळा दूर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

चर्चेत बनश्री चौगुले, ईराप्पा हसुरी यांनीही भाग घेतला. सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.

सभेला उपसभापती इंदू नाईक, प्रकाश पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

चाैकट :

‘सेतू’ चाचणी शाळेतच घ्या

गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. त्यामुळे ऑनलाईन ‘सेतू’ अभ्यासक्रमांतर्गत मागील अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन चाचण्या घेण्यात येत आहेत. परंतु, केवळ चाचण्या घेऊन काही फायदा होणार नाही. त्यासाठी ‘सेतू’ अभ्यासक्रमातील ‘ब्रीज’ कोर्सचे अध्यापन शाळेतच घ्याव्यात आणि त्यानंतर चाचण्या घ्याव्यात, अशी सूचनाही तेली यांनी केली.

पंचायत समिती : ०२०९२०२१-गड-०३

Web Title: Send a proposal for re-employment of 'those' health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.