सीमाभागातील ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:52+5:302021-05-27T04:25:52+5:30
निपाणी भागातील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्याचबरोबर बेडकिहाळ येथील चिकोडी तालुका श्री सरस्वती क्रेडिट ...
निपाणी भागातील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्याचबरोबर बेडकिहाळ येथील चिकोडी तालुका श्री सरस्वती क्रेडिट सौहार्द सहकार्य संस्थेचे ते संस्थापक होते. बेडकिहाळ अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष, श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक, कल्याण सिद्धेश्वर प्राथमिक कृषिपतीन संघाचे संस्थापक होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
गोपाळ पाटील यांच्या निधनाने बेडकिहाळ गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर बेडकिहाळ गावातील व्यापारी संघटनांनी संपूर्ण व्यवहार बंद ठेवले होते तर गुरुवार दिनांक २७ रोजी ग्रामपंचायतीने बेडकिहाळ बंदचे आवाहन केले आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील यांची ते व्याही होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा दत्तकुमार पाटील, सून सुप्रिया पाटील, चार मुली, चार भाऊ, पुतणे, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो गोपाळदादा पाटील