एस.टी प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली-कोल्हापूर मार्गावर घडली दुर्देवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 03:16 PM2022-10-08T15:16:30+5:302022-10-08T15:37:05+5:30

मुजावर हे कोल्हापूरला आपल्या मुलीकडे निघाले होते.

Senior citizen dies of heart attack on ST journey, incident in Sangli-Kolhapur ST bus | एस.टी प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली-कोल्हापूर मार्गावर घडली दुर्देवी घटना

संग्रहित फोटो

Next

सुरज पाटील

हेरले: कोल्हापूर डेपोच्या एस.टी बस मधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. फक्रुद्दीन अब्दुल मुजावर (वय ७९, रा. उदगाव, ता. शिरोळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  सांगलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये ही घटना घडील. वाहकाने प्रसंगावधान राखून प्रवाशाचा जीव वाचवण्याचा केला प्रयत्न मात्र दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की ,कोल्हापूर डेपोची एसटी बस (MH-१४-BT-२८६१)  ही सांगलीहून चालक विलास पाटील आणि महिला वाहक यु.आर. सडोले हे कोल्हापूर कडे येत होते. उदगाव (ता. शिरोळ) येथील फक्रुद्दीन अब्दुल मुजावर यांना त्यांच्या मुलाने जयसिंगपूर येथे या एस.टी बस मध्ये बसवले. यावेळी ४० प्रवासी या एसटी बस मधून प्रवास करत होते. मुजावर हे कोल्हापूरला आपल्या मुलीकडे निघाले होते.

चोकाक जवळ एसटी बस आली असता मुजावर यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक पणे त्यांच्या तोंडाला फेस येऊ लागल्याने  महिला वाहकाने तात्काळ ही माहिती चालकाला दिली. चालकाने एस.टी बस हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी मुजावर यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे घोषित केले. चालक आणि वाहक यांनी या घटनेची माहिती हातकणंगले पोलीस आणि कोल्हापूर येथील डेपो मॅनेजरला कळवली.

बसची वेळ निघून गेल्यानंतर बसची वाट पाहत थांबलेल्या मुजावर यांच्या नातेवाईकांनी डेपोमध्ये चौकशी केली असता ही दुर्देवी घटना समजली. नातेवाईकांनी तात्काळ हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. हातकणंगले पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले येथे पाठवण्यात आला.

Web Title: Senior citizen dies of heart attack on ST journey, incident in Sangli-Kolhapur ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.