जेष्ठ नेते प्रा एन. डी. पाटील यांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:44 AM2022-01-17T05:44:45+5:302022-01-17T05:45:02+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा.एन.डी.पाटील (वय ९३) यांची ...
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा.एन.डी.पाटील (वय ९३) यांची प्रकृती रविवारी अत्यंत गंभीर बनली. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नाही. गेली चार दिवसांत त्यांच्या पोटात अन्नपाणी गेलेले नाही.
वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले..पण तिथे गेल्यावर त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने बोलणे बंद झाले आहे..डॉक्टर त्यांच्या उपचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत..कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना बाधा झाली पण या वयातही हा समाजयोद्धा कोरोनाला हरवून सुखरूप घरी आला.. त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती..गेल्या दीड वर्षांपासून त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याने भेटायला आलेल्या लोकांना ते ओळखत नव्हते..पण तरीही वाचन आणि दैनंदीन जीवन सुरळीत होते. मूळ शरीर धिप्पाड होते त्यामुळे इतर बारीकसारीक आजाराला ते आतापर्यंत कधीच नमले नाहीत.आता मात्र त्यांचे शरीर वयोमानानुसार थकले आहे..आवाजही मलूल झाला होता आणि त्यातच ब्रेन स्ट्रोक्स आल्याने त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे..त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई यांच्यासह सारे कुटुंब आणि चळवळीतील परिवार सरांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करत आहेत..