कळंबा कारागृहातील प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:19 PM2020-12-24T19:19:30+5:302020-12-24T19:20:57+5:30
Jail Crimenews Kolhapur- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कारागृहात सापडलेल्या गांजा, मोबाईल आदी वस्तूंबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली. गुरुवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन चौकशी केली.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत शुक्रवारी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कारागृहात सापडलेल्या गांजा, मोबाईल आदी वस्तूंबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली. गुरुवारी सकाळी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन चौकशी केली.
सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी तीन गठ्ठे कारागृहातील संरक्षण भिंतीवरून आत फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले. हे गठ्ठे मंगळवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षकास मिळाले. गठ्ठ्यामध्ये पाऊण किलो गांजा, नवे दहा मोबाईल संच, पेनड्राईव्ह, मोबाईल कॉड आदी साहित्य सापडले होते.
कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदल्याने खळबळ उडाली. याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू झाली. चौकशीसाठी अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे शुक्रवारी कोल्हापुरात येत असून ते कारागृहाला भेट देऊन चौकशी करणार आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून कारागृहातील सर्व बराकची झडती घेतली. दीड महिन्यात दुसऱ्यांदा प्रकार घडल्याने ड्युटीवरील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पॅरोलवरील कैदी कारागृहात परतत आहेत. त्यातूनच प्रकार घडल्याची शक्यता कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी व्यक्त केली.