वेगळा फोटो : आदित्य वेल्हाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:52+5:302020-12-11T04:49:52+5:30
‘घरी राहा-सुरक्षित राहा’ असे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर आवाहन केले, पण ज्यांचे घरच नाही त्यांचे काय. तरीदेखील ते ...
‘घरी राहा-सुरक्षित राहा’ असे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर आवाहन केले, पण ज्यांचे घरच नाही त्यांचे काय. तरीदेखील ते सुरक्षित राहिले. सीपीआर रुग्णालयाच्या समोरील बसस्टॅाप हे त्याचे एक बोलके उदाहरण. निगवे (ता. करवीर) येथील लक्ष्मी वरुटे नावाची एक वृद्धा गेली पाच वर्षे येथे राहते. या पाच वर्षांत तिने दोन वेळचा महापूर, भीमा-कोरेगावची दंगल आणि आता सुरू असलेली कोरोनाची जीवघेणी साथही पाहिली. सीपीआरसमोर जायला कुणी धजावत नव्हते, पण ही वृद्धा सर्व संकटे झेलत येथेच राहिली. कुटुंबाने अव्हेरल्यानंतर सीपीआरचा बसस्टॉप हेच तिचे हक्काचे घर बनले आहे. ऊन, वारा, पाऊस झेलत वसवलेला हा निवारा कुणी हिरावून तर घेणार नाही ना या चिंतेने ती वृद्धा सैरभैर होते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)