सीपीआरमधील सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:12 AM2021-02-05T07:12:10+5:302021-02-05T07:12:10+5:30

कोल्हापूर : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सीपीआरमधील सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शक्य तेवढी ...

Service disrupted in CPR | सीपीआरमधील सेवा विस्कळीत

सीपीआरमधील सेवा विस्कळीत

googlenewsNext

कोल्हापूर : चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सीपीआरमधील सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शक्य तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राज्य सरकारी गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने हे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. सकाळी सीपीआरमधील दीडशेहून अधिक कर्मचारी टाउन हॉलमध्ये जमले. तेथे घोषणाबाजी करण्यात आली. अध्यक्ष रमेश भोसले, संजय क्षीरसागर, रघुनाथ पोवार, रमेश चव्हाण, महेश पाटील, गणेश आसगावकर यांची भाषणे झाली.

सीपीआरसाठी लागणारे साहित्य आणण्यापासून ते कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. यातील स्वच्छतेच्या कामावरही परिणाम झाला. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सहाय घेण्यात आले. शवविच्छेदनासाठी पर्यायी खासगी व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती.

Web Title: Service disrupted in CPR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.