परस्थ भक्तांची सेवा थेट अंबाबाई चरणी

By admin | Published: January 14, 2017 12:38 AM2017-01-14T00:38:01+5:302017-01-14T00:38:01+5:30

अंबाबाई आणि भक्तांमधील अंतर दूर करणार : देवस्थान पाठविणार आॅनलाईन व्हिडिओ, आॅडिओ क्लिप

The service of Parthastha devotees is directly related to Ambabai | परस्थ भक्तांची सेवा थेट अंबाबाई चरणी

परस्थ भक्तांची सेवा थेट अंबाबाई चरणी

Next



इंदूमती गणेश ल्ल कोल्हापूर
आपण वाहिलेली भक्ती, पूजा आणि प्रसाद अंबाबाईच्या चरणांपर्यंत पोहोचावा, अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. मात्र, देश-परदेशात राहणाऱ्या भक्तांना ते बव्हंशी शक्य नसते. अंबाबाई आणि भक्तांमधील हे अंतर दूर करण्यासाठी देवस्थान समितीने पुढाकार घेतला आहे. समितीतर्फे ही आॅनलाईन सेवा सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे भक्तांना त्यांच्यावतीने करण्यात आलेली पूजा, मंत्रोच्चार ऐकता आणि आपण वाहिलेला प्रसाद थेट देवीच्या चरणी पोहोचलेला पाहता आणि अनुभवता येणार आहे.
अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभरात देश-विदेशांतून ३५ लाखांहून अधिक भाविक कोल्हापुरात येतात. मात्र, अनेक भाविकांना इच्छा असूनही प्रत्यक्ष देवीच्या दर्शनासाठी येता येत नाही किंवा अभिषेकासारखे पूजाविधी करता येत नाहीत. भाविक आणि अंबाबाईमधील हे अंतर दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने २००९ साली आॅनलाईन दर्शन सुरू केले. एखाद्या देवतेचे जगभरातील भाविकांना थेट आॅनलाईन दर्शन देणारे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे हे पहिले मंदिर आहे. त्यानंतर शिर्डी संस्थानने आॅनलाईन दर्शन सुरू केले. कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने ६६६.ेंँं’ं७े्र‘ङ्म’ँंस्र४१.ूङ्मे ही वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटवर अंबाबाई मंदिराचा पूर्वेतिहास, देवीचे माहात्म्य, देवीची विविध रूपांतील छायाचित्रे यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटवरून भक्तांकडून देणगी स्वीकारून प्रसाद पाठविला जातो. अमेरिका, रशिया, आॅस्ट्रेलिया, लंडन यांसारख्या युरोपियन देशांतील भारतीय नागरिकांनी या वेबसाईटला व्हिजिट दिल्या आहेत. मात्र, एखाद्या भक्ताला आपल्यावतीने केली जात असलेली पूजा आणि प्रसाद देवीच्या चरणापर्यंत पोहोचल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे ही मन:शांती आणि समाधानाची बाब असते. त्यामुळे देवस्थान समितीतर्फे पूजा आणि प्रसादाची आॅडिओ व्हिडिओ क्लिप भक्तांना पाठविण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रसाद थेट भक्तांना पोहोच करण्यात येणार आहे. त्यासाठी हे सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी आॅनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती
२० तारखेला उघडण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील तिसरे मंदिर
आॅनलाईन देणगीद्वारे भक्तांना आॅडिओ-व्हिडिओ क्लिप आणि प्रसाद पोहोचविणारे अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तिसरे मंदिर असणार आहे. यापूर्वी सिद्धिविनायक मंदिर आणि महाकालेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनाने ही सेवा सुरू केली आहे.
या सुविधेसाठी देवस्थान समिती आणि सदरची कंपनी यांच्यामध्ये टायअप असेल. मंदिराच्या वेबसाईटवर पाद्यपूजा, अभिषेक, कुंकु मार्चन, असे पूजेचे विविध प्रकार व त्यांची देणगी रक्कम आॅनलाईन दिलेली असेल. भक्त आपल्या इच्छेनुसार देणगीची रक्कम आॅनलाईनद्वारे देवस्थान समितीकडे भरतील. त्यानंतर भक्तांनी सांगितलेल्या दिवशी पुजारी त्यांच्या नावाने देवीचा प्रसाद अंबाबाईच्या चरणी वाहतील. हा विधी करताना होणारे मंत्रोच्चार आणि संकल्प व सदरच्या पूजेची आॅडिओ आणि व्हिडिओ क्लिप भक्ताला आॅनलाईन पाठविली जाईल.

Web Title: The service of Parthastha devotees is directly related to Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.