अंबाबाई देवस्थानसह स्वयंसेवी संस्थांची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:21 PM2017-09-23T17:21:15+5:302017-09-23T17:27:43+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावहून कोल्हापुरात आलेल्या भाविकांना स्वाइन फ्लूपासून वाचविण्यासाठी देवस्थानचे मिश फॅन, त्यांना उन्हातान्हापासून त्रास झाला तर तातडीने आरोग्य सेवा देणारे प्राथमिक उपचार केंद्र, दर्शनरांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, दर्शनरांगांच्या सुयोग्य नियोजनासाठी देवस्थान समितीसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते दिवसरात्र काम करीत आहेत.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावहून कोल्हापुरात आलेल्या भाविकांना स्वाइन फ्लूपासून वाचविण्यासाठी देवस्थानचे मिश फॅन, त्यांना उन्हातान्हापासून त्रास झाला तर तातडीने आरोग्य सेवा देणारे प्राथमिक उपचार केंद्र, दर्शनरांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, दर्शनरांगांच्या सुयोग्य नियोजनासाठी देवस्थान समितीसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते दिवसरात्र काम करीत आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाºया पावसाने उघडीप दिल्याने आता अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांचा ओघ वाढला आहे. दिवसभरात लाख-दीड लाखाच्या संख्येने येणाºया भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या नवरात्रौत्सव काळात स्वयंस्फूर्तीने राबविणारे शेकडो हात पुढे आले आहेत.
स्वाइन फ्लूविरोधी ‘मिश फॅन’
कोल्हापुरात स्वाइन फ्लूचे अनेक रुग्ण आढळले आहेत. मंदिराच्या आवारात तर भाविकांचे लोंढेच्या लोंढे असतात. त्यांना स्वाइन फ्लूची लागण होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वाइन फ्लूविरोधी मिश फॅन बसविण्यात आले आहेत. या फॅनच्या यंत्रणेमध्ये प्रतिबंधात्मक औषधाचे दोन थेंब टाकले की फॅनद्वारे हे औषध हवेत पसरते आणि त्याचा प्रभाव पुढे तीन तास राहतो. दर तीन तासांनी हे औषध घातले जात आहे. अंबाबाईचा गाभारा, कासव चौक, दर्शनरांगांमध्ये सहा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्नछत्र या पाच ठिकाणी हे फॅन बसविण्यात आले आहेत.
पिण्याचे पाणी
दर्शनरांगांमध्ये थांबलेल्या भाविकांना श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिक ‘सेवा’ म्हणून हे पाणी रांगांमध्ये पोहोचवीत आहेत. मंदिराच्या परिसरात मनुग्राफ, तर विद्यापीठ गेटसमोर प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या वतीनेही पाण्याची सोय करण्यात आली आहे.
आरोग्य केंद्र
भाविकांना गर्दीचा त्रास झाल्यास त्यांना तातडीने प्रथमोपचार मिळावेत, यासाठी अंबाबाई मंदिर परिसरातील उद्यानात अॅस्टर आधार व व्हाईट आर्मीच्या वतीने प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आले आहे. बाह्य परिसरात अॅपल हॉस्पिटलने सोय केली आहे. शनिवारी एका वृद्ध भाविकाला उन्हामुळे चक्कर आल्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत अडीचशेहून अधिक भाविकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे.
रांगांचे नियोजन
भाविकांच्या दर्शनरांगांचे योग्य नियोजन करण्यासाठी व्हाईट आर्मी, जीवनज्योती संस्थेचे जवान आणि अनिरुद्ध बापू सेवाभावी संस्थेचे कार्यकर्त काम करीत आहेत. पहाटेपासून अंबाबाईची पालखी संपल्यानंतरही हे कार्यकर्ते कार्यरत असतात.
राबणाºयांचीही काळजी
देवीला येणाºया भाविकांना सेवा देणाºया आणि रात्रंदिवस राबणाºया सर्व व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांचीही काळजी देवस्थानच्या वतीने घेतली जात आहे. कार्यकर्त्यांसह पोलीस असतील त्या ठिकाणावर त्यांच्यासाठी नाष्टा व जेवणाचे पॅकेट आणि पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. रात्री गर्दी ओसरली की मंदिराच्या परिसरातील अन्नछत्रात जेवणाचीही सोय करण्यात आली आहे.