विद्यापीठ इतिहास परिषदेचे अधिवेशन शनिवारपासून

By admin | Published: February 9, 2015 11:42 PM2015-02-09T23:42:38+5:302015-02-09T23:57:19+5:30

व्याख्यानमालेअंतर्गत रविवारी रत्नागिरीतील प्रा. रमेश कांबळे यांचे ‘चिमाजीआप्पांचे मराठ्यांच्या इतिहासातील योगदान’ विषयावर विशेष व्याख्यान होईल.

The session of the University History Conference will begin on Saturday | विद्यापीठ इतिहास परिषदेचे अधिवेशन शनिवारपासून

विद्यापीठ इतिहास परिषदेचे अधिवेशन शनिवारपासून

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे इतिहास परिषदेचे २० वे वार्षिक अधिवेशन शनिवारी (दि. १४) व रविवारी (दि. १५) मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात होणार आहे. त्यात ‘कोकणचा इतिहास’, ‘गोपाळकृष्ण गोखले व सुभाषचंद्र बोस : जीवन व कार्य’ यावर विशेष सत्र होणार आहे.अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अरुण भोसले असतील. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर बेडकीहाळ यांचे बीजभाषण होणार आहे.
डॉ. अ. रा. कुलकर्णी स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत रविवारी रत्नागिरीतील प्रा. रमेश कांबळे यांचे ‘चिमाजीआप्पांचे मराठ्यांच्या इतिहासातील योगदान’ विषयावर विशेष व्याख्यान होईल. या अधिवेशनाचा समारोप विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. एम. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या इतिहास परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने प्रा. सुरेश शिखरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The session of the University History Conference will begin on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.