कागलमध्ये १०० घरे साकारणार

By admin | Published: April 28, 2015 10:25 PM2015-04-28T22:25:09+5:302015-04-28T23:46:44+5:30

रमाई आवास योजना : कागल नगरपालिकेला नव्याने दीड कोटींचा निधी मंजूर

To set up 100 homes in Kagal | कागलमध्ये १०० घरे साकारणार

कागलमध्ये १०० घरे साकारणार

Next

कागल : राज्य शासनाच्या रमाई आवास योजनेसाठी कागल नगरपालिकेला नव्याने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, शंभरजणांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे रोख अनुदान मिळणार आहे. यापूर्वी कागल नगरपरिषदेने २०११-२०१२ मध्ये ६७ लाख रुपये, २०१२-२०१३ साठी एक कोटी ६३ लाख इतका निधी १६४ जणांना दिला आहे. या योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करणारी कागल नगरपरिषद राज्यात एकमेव ठरली आहे.
अनुसूचित जाती-जमातीमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना हे अनुदान मिळते. जातीचा दाखला, दारिद्र्यरेषेखाली नाव आणि प्रॉपर्टी कार्ड या कागदपत्रांवर घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून रोख दीड लाख रुपये मिळतात. कागल शहरात जवळपास ३०० दलित कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यापैकी १६४ जणांना यापूर्वी हे अनुदान मिळाले आहे. आता सन २०१४-२०१५ साठी दीड कोटी रुपये म्हणजे १०० कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपये घर बांधण्यासाठी मिळणार आहेत. या योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अनुदान मिळाल्यानंतर दारिद्र्यरेषेवरीलही कुटुंबांचा विचार यासाठी करता येतो. मात्र, त्यासाठी दारिद्र्यरेषेखालील एकही लाभार्थी शिल्लक राहिलेला नसला पाहिजे. दीड लाख रुपयांचे हे अनुदान विना-परतावा आहे. या दीड लाखांत अथवा त्यामध्ये आपली रक्कम घालून लाभार्थ्यांना आपले घर बांधता येते. येथील आंबेडकरनगर, बेघर वसाहत, मातंग वसाहत या ठिकाणी टुमुकदार अशी घरे या योजनेतून साकारली आहेत.


नगरपालिका कर्मचाऱ्यांची गृहनिर्माण संस्था
शाहू कॉलनीजवळ कारखाना रस्त्याजवळ कागल नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी दोन एकर जागा राखीव आहे. एकूण ८८ सभासदांपैकी ४४ सभासद हे सफाई कर्मचारी आहेत. लवकरच यांचेही काम सुरू होणार आहे. ‘१ मे’ रोजी फलक अनावरण सोहळा होणार आहे.

Web Title: To set up 100 homes in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.