गट-तट बाजूला ठेवा, पक्षवाढीसाठी कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:07+5:302021-09-06T04:27:07+5:30

आमदार पाटील म्हणाले, चंदगड मतदारसंघात आपण २ वर्षात २०० कोटींची कामे केली आहेत. रखडलेला उचंगी, सर्फनाला व किटवडे प्रकल्प ...

Set aside the group, work for party growth | गट-तट बाजूला ठेवा, पक्षवाढीसाठी कामाला लागा

गट-तट बाजूला ठेवा, पक्षवाढीसाठी कामाला लागा

Next

आमदार पाटील म्हणाले, चंदगड मतदारसंघात आपण २ वर्षात २०० कोटींची कामे केली आहेत. रखडलेला उचंगी, सर्फनाला व किटवडे प्रकल्प मार्गी लावून गडहिंग्लज पूर्वभागाचा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्याचा आपला प्रयत्न आहे. जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, पक्षाशी एकनिष्ठ रहा, एकमेकांच्या हातात हात घालून काम करा. यावेळी अमर चव्हाण, वैशाली पाटील यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, अल्बर्ट डिसोझा, दीपक जाधव, प्रकाश पताडे, शिवप्रसाद तेली, राजू होलम, दशरथ कुपेकर, जयप्रकाश मुन्नोळी, महाबळेश्वर चौगुले, जितेंद्र शिंदे, मनीषा तेली, धनश्री चौगुले, इक्बाल काझी आदी उपस्थित होते. जयसिंग चव्हाण यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रास्ताविक केले. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. बशीर पठाण यांनी आभार मानले.

जि.प., पं.स. स्व:बळावर

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविणार आहोत, अशी घोषणा आमदार पाटील यांनी केली.

पक्षश्रेष्ठींनी दखल घ्यावी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही चंदगड मतदारसंघात दुसऱ्यांच्या पक्षाला बाधा आणण्याचे प्रयत्न आघाडीतील घटक पक्षांकडून सुरू आहेत. पक्षश्रेष्ठींनी त्याची दखल घ्यावी, अशी विनंती आमदार पाटील केली.

फोटो ओळी : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील मेळाव्यात आमदार राजेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुकुंद देसाई, ए. वाय. पाटील, रामाप्पा करिगार, गंगाधर व्हसकोटी आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०५०९२०२१-गड-०२

Web Title: Set aside the group, work for party growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.