कर्नाटकच्या धर्तीवर अग्निशमन दल स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:38 AM2019-02-28T00:38:55+5:302019-02-28T00:39:34+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत अग्निशमन दलाची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे गडहिंग्लज विभागातील प्रत्येक तालुक्यांत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ...

 Set fire brigade on the lines of Karnataka | कर्नाटकच्या धर्तीवर अग्निशमन दल स्थापन करा

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अत्याधुनिक अग्निशमन केंद्रासंदर्भात चर्चा केली.

googlenewsNext
ठळक मुद्देसंध्यादेवी कुपेकर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडहिंग्लज विभागासाठी मागणी

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत अग्निशमन दलाची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे गडहिंग्लज विभागातील प्रत्येक तालुक्यांत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सुसज्ज अग्निशमन दलाची स्थापना करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी खास पत्रातून केली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली.

आगीच्या घटनेतील नुकसान म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान असल्यामुळे यासंदर्भात सकारात्मक निर्णयाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र वगळता आजरा व चंदगड तालुक्यांत अग्निशमनची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे नजीकच्या संकेश्वर व निपाणी येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागते. त्यास विलंब लागत असल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीच्या घटना वारंवार घडत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी औरनाळ येथील आगीत पाटीलवाड्याचे सुमारे ४० लाखांचे, तर चार दिवसांपूर्वी बसर्गे येथील आगीत सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तीनही तालुक्यांत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सुसज्ज अग्निशमन केंद्र व दलाची स्थापना करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.

अशी आहेत कर्नाटकातील केंद्रे
२५ किलोमीटर परिघाच्या अंतरावर प्रत्येक तालुक्याला एक फायर स्टेशन आहे. त्यामध्ये दोन अत्याधुनिक अग्निशमन गाड्या व २५ प्रशिक्षित कर्मचारी आहेत. या केंद्रांवर नियंत्रण करण्यासाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र कार्यालय व अग्निशमन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबरोबरच ६० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे खास आपत्ती निवारण दल स्थापन करण्यात आले आहे. या धर्तीवर अग्निशमन केंद्राची मागणी कुपेकर यांनी केली आहे.

 

Web Title:  Set fire brigade on the lines of Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.