‘आयजीएम’चे प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:34+5:302021-07-17T04:19:34+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आमदार आवाडे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आमदार आवाडे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. आयजीएम रुग्णालयात आवश्यक रिक्त पदे भरणे, प्रलंबित ४२ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे, बेड क्षमता ३०० करणे, देखभाल दुरुस्ती व आवर्ती खर्चासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देणे, आदी मागण्या आवाडे यांनी केल्या. त्यावर मंत्री टोपे यांनी हे प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही दिली. या वेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, आदी उपस्थित होते.
चौकट : सोमवारपासून आस्थापना सुरू करा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह दर १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे सोमवार (दि. १९) पासून इतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी मंत्री टोपे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन टोपे यांनी दिले.
फोटो ओळी
१६०७२०२१-आयसीएच-०१
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी शिष्टमंडळासोबत भेट दिली. या वेळी राहुल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते उपस्थित होते.