वळिवडेतील सेवा प्रतिष्ठान व डॉ. मालती दोशी हायस्कूलचा रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:00+5:302021-07-10T04:17:00+5:30
या कार्यक्रमास ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. वळिवडे येथील सेवा प्रतिष्ठान व डॉ. कु. मालती ...
या कार्यक्रमास ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
वळिवडे येथील सेवा प्रतिष्ठान व डॉ. कु. मालती मोहनलाल दोशी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूलच्या प्रांगणात रक्तदान शिबिर व स्व. कृष्णात शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कोरोना योद्ध्यांचा सन्मान व वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये आशासेविका, डॉक्टर, अंगणवाडीसेविका, ग्रा. पं. कर्मचारी, पत्रकार, ग्रीन वळीवडेचे कार्यकर्ते यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कृष्णात शेळके यांच्या मित्रपरिवाराकडून शेळके कुटुंबीयांना मदतीचा धनादेश ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला तसेच व्ही. बालाजी ट्रान्सपोर्टचे मालक चंद्रकांत पाटील यांनी पंचगंगा स्मशानभूमीस शेणीदानासाठी धनादेश ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमास वारणा दूध संघाचे संचालक डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. संदीप हजारे, उद्योजक तांबवे, भगवान पळसे, प्रकाश शिंदे, दीपक पासाना, बली खांडेकर, सुहास तामगावे, रावसाहेब दिगंबरे, प्रल्हाद शिरोटे, गणपती शेळके, संजय शेळके, शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पोवार, तळवार सर, भाऊसो शेळके, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना प्रदीप पाटील यांनी केली तर उपस्थितांचे व रक्तदात्यांचे आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.
फोटो ओळ-वळिवडे (ता. करवीर) येथील सेवाप्रतिष्ठान व डॉ. कु. मालती मो. दोशी हायस्कूल व स्वर्गीय कृष्णात शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे, सरपंच अनिल पंढरे, राजगोंडा वळीवडे, चंद्रकांत पाटील, प्रकाश शिंदे, व मान्यवर उपस्थित होते.