सेवक संघाची २६ फेब्रुवारीला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:22+5:302021-02-15T04:22:22+5:30
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मेनन अँड मेनन लिमिटेडचे सेवानिवृत्त ...
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये व्याख्यान
कोल्हापूर : येथील भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मेनन अँड मेनन लिमिटेडचे सेवानिवृत्त सहायक महाव्यस्थापक संजय बुरसे यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले. त्यांनी ‘विद्यमान परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. इन्स्टिट्यूटचे प्रभारी संचालक प्रा. रवींद्र मराठे, संगणक विभागप्रमुख डॉ. के. एम. अलास्कर, व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. आर.डी. जाधव यांच्या सहकार्याने डॉ. बी. आर. पाटील, इंद्रजित देसाई, वैशाली पाटील यांनी व्याख्यान आयोजित केले.
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये सत्कार
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसकडून महाराष्ट्र हायस्कूलचे कनिष्ठ लिपिक नरेंद्र बनगे यांना ‘श्री प्रिन्स शिवाजी प्रशासकीय सेवक सेवागौरव पुरस्कार, तर गर्ल्स हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुलभा शिंदे यांना ‘कवी प्रा. डॉ. सूर्यकांत खांडेकर शिक्षक सेवागौरव पुरस्कार’ मिळाला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने संस्थेचे संचालक विनय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. एस. रामाणे होते. यावेळी उपमुख्याध्यापक ए. एन. जाधव, उपप्राचार्य यू. आर. आतकिरे, पर्यवेक्षक यू. एम. पाटील, के. ए. ढगे, बी. बी. मिसाळ, एस. एस. मोरे, आदी उपस्थित होते. ए. आर. भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
‘पद्माराजे ज्युनिअर कॉलेज’मध्ये नाटक सादरीकरण
कोल्हापूर : विद्यार्थिनींना नाटक साहित्य प्रकाराचे आकलन होण्यासाठी प्रिन्सेस पद्माराजे ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्समध्ये उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये तन्वी विजय दळवी आणि श्रीशा अरुण कुलकर्णी यांनी काही भूमिकांचे सादरीकरण केले. त्यात तन्वीने बिब्बे विकणारी स्त्री आणि डॉ. आनंदी गोपाळ जोशी या भूमिका प्रभावीपणे सादर केल्या. श्रीशाने विनोदी भूमिकेच्या माध्यमातून सकस आहार आणि घरगुती पदार्थांचे महत्त्व सांगितले. जी. एन. पैठणे यांच्या हस्ते या विद्यार्थिनींना पारितोषिके देण्यात आली. मानसी आणि जुई पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमासाठी प्राचार्या एस. आर. चौगले, प्रा. एस. एस. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
एनसीसी कॅडेटचा सहभाग
कोल्हापूर : येथील गोखले कॉलेजमधील ३० एनसीसी कॅडेट यांनी पल्स पोलिओ मोहिमेत सहभाग नोंदविला. त्यांनी विविध केंद्रावर जाऊन बालकांना डोस दिले. ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लसीकरण मोहीम राबविली. त्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी प्रा. मंजिरी मोरे, प्राचार्य डॉ. पी. के. पाटील, आदींचे मार्गदर्शन लाभले.