कोथळी येथे सात मगरींच्या पिल्लांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:41+5:302021-05-27T04:25:41+5:30
कोथळी येथे सहा ते सात मोठ्या मगरींचा वावर आहे. अशातच मंगळवारी रात्री वीटभट्टीजवळ कामगारांना नऊ फुटांची मगर आढळून आली. ...
कोथळी येथे सहा ते सात मोठ्या मगरींचा वावर आहे. अशातच मंगळवारी रात्री वीटभट्टीजवळ कामगारांना नऊ फुटांची मगर आढळून आली. तत्काळ या कामगारांनी वाईल्ड लाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटीच्या प्राणिमित्रांशी संपर्क केला. त्यानंतर तत्काळ अभिजित खामकर, शुभम रास्ते, साई रसाळ, सुमित धोत्रे, सचिन सुरपुसे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी सात मगरींच्या पिल्लांना जीवदान देऊन तीन मगरींची अंडी आढळून आल्याने त्यांना उबविण्यास सुरक्षितस्थळी ठेवले. संगमावरील परिसरात मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी नदीपरिसरात जाताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सरपंच वृषभ पाटील यांनी केले आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री वनपाल घनशाम भोसले यांच्या आदेशानुसार सात मगरींच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
फोटो - २६०५२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - कोथळी (ता. शिरोळ) येथे सात मगरींची पिले व तीन अंडी आढळून आली.