घरफाळा घोटाळ्यात आणखी सात अधिकारी, भूपाल शेटे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:20 PM2020-08-19T15:20:06+5:302020-08-19T15:21:12+5:30

घरफाळा घोटाळा प्रकरणात आणखी सात अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय भोसले यांनी पूर्वीच्या अहवालामध्ये ही नावे लपविली याबद्दल त्यांच्याकडून कर निर्धारक पदाचा कार्यभार काढून घेऊन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Seven more officers, Bhupal Shete, claim in house tax scam | घरफाळा घोटाळ्यात आणखी सात अधिकारी, भूपाल शेटे यांचा दावा

घरफाळा घोटाळ्यात आणखी सात अधिकारी, भूपाल शेटे यांचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्दे घरफाळा घोटाळ्यात आणखी सात अधिकारी, भूपाल शेटे यांचा दावासिस्टीम मॅनेजरच्या अहवालातून स्पष्ट

कोल्हापूर : घरफाळा घोटाळा प्रकरणात आणखी सात अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय भोसले यांनी पूर्वीच्या अहवालामध्ये ही नावे लपविली याबद्दल त्यांच्याकडून कर निर्धारक पदाचा कार्यभार काढून घेऊन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शेटे म्हणाले, घरफाळा घोटाळ्यामध्ये एकूण २० प्रकरणांची चौकशी समितीने फेरचौकशी करून आयुक्त यांच्याकडे मंगळवारी अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सिस्टीम मॅनेजर यांचा सर्व प्रकरणांच्या संगणकीय अहवालाचाही समावेश आहे.

ज्यामध्ये असेसमेंट, असेसमेंट डिटेल्स, डिमांड डिटेल्स, कलेक्शन डिटेल्स व मिळकतींची नोंद अंतिम करण्यात आलेले युजर आयडी वापरलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव, ऑथोराइज करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्याचा पासवर्ड यांचा समावेश आहे.

यामध्ये पूर्वीचे चार कर्मचारी व सध्याचे या अहवालातील सात कर्मचारी अशा एकूण ११ कर्मचारी व अधिकारी या प्रकरणात सामील असल्याबाबतचा अहवाल आहे. संजय भोसले यांनी दिलेल्या अहवालात ही माहिती आयुक्तांपासून लपविली असल्याचे या संगणकीय अहवालावरून सिद्ध झाले आहे. यापूर्वी संजय भोसले यांनी जो घरफाळा चौकशीचा बोगस व बनावट अहवाल स्वत: तयार करून फक्त चार कर्मचारी यांना दोषी ठरवून आयुक्त यांची फसवणूक केली आहे.

त्यांना दिलेला तीन कोटी 18 लाख इतक्या रकमेचा घरफाळा अहवाल चुकीचा असल्याचे या संगणकीय अहवालानुसार सिद्ध झाले आहे. काही मिळकतधारकांनी धनादेशाने घरफळा जमा केला असताना भोसले यांनी अहवालात दाखवलेले नाही. उलट या करदात्यांवर या भरलेल्या रकमेवर दंडासह बोगस रक्कम येणे दाखविली.

संगणकीय अहवालामध्ये भरलेल्या रकमा जमा असलेचे सिस्टीम मॅनेजर यांनी नमूद केलेले आहे. त्यामुळे ही रक्कम सूडबुद्धीने दिवाकर कारंडे व इतर कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी बोगस दाखविली. त्याप्रमाणे संजय भोसले यांनी आपल्या कारकिर्दीतील २००९ पासून ते २०१३ पर्यंत महापालिकेचे भाडेवाढीनुसार नुकसान झाले आहे. त्यांचीही बनावटगिरी संगणकीय अहवालामध्ये दिसून आली आहे.

सिस्टीम मॅनेजरवरही कारवाई करा

संजय भोसले यांचा कार्यकाल २००९ ते २०१३ ची माहिती मागणी करूनही सिस्टीम मॅनेजर यांनी अजूनही दिलेली नाही. याच १४ प्रकरणांपैकी अजून पाच प्रकरणांमध्ये संजय भोसले यांचा सहभाग आहे. म्हणूनच सिस्टीम मॅनेजर ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत सिस्टीम मॅनेजर यांच्यावरदेखील फौजदारी कारवाई करावी, अशी नगरसेवक भूपाल शेटे यांनी मागणी केली.

Web Title: Seven more officers, Bhupal Shete, claim in house tax scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.