श्रीपूजकासह सातजणांवर गुन्हा

By Admin | Published: April 17, 2016 12:48 AM2016-04-17T00:48:38+5:302016-04-17T00:48:38+5:30

राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश : तृप्ती देसाई मारहाण प्रकरण

Seven people, including Shripad, have a crime | श्रीपूजकासह सातजणांवर गुन्हा

श्रीपूजकासह सातजणांवर गुन्हा

googlenewsNext

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीपूजक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सातजणांवर शनिवारी पहाटे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. देसाई यांना मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे.
या गुन्ह्याचा खबरी अहवाल न्यायालयास सादर केला असून, संशयित आरोपींना समन्स बजावून चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलाविणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.
संशयित आरोपी अ‍ॅड. केदार वसंत मुनिश्वर (वय ४८), श्रीश रामभाऊ मुनिश्वर (६०), चैतन्य शेखर अष्टेकर (३५), मयूर मुकुंद मुनिश्वर (४२), निखिल शानभाग (२८, सर्व रा. वांगी बोळ, महाद्वार रोड), राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन मुरलीधर कल्याणकर (५२), जयकुमार रंगराव शिंदे (५०, दोघे रा. मंगळवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. देवीच्या श्रीपूजकांवर अशा प्रकारच्या घटनेबद्दल झालेली ही पहिलीच कारवाई आहे.
तृप्ती देसाई काही महिलांसह बुधवारी (दि. १३) अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आल्या असताना त्यांना गाभाऱ्यातून बाहेर ओढत श्रीपूजकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा कोल्हापुरात येऊन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देसाई यांनी जिल्हा प्रशासनास दिला होता. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही पोलिस प्रशासनास चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पोलिस प्रशासनाची तातडीने बैठक बोलावून अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करत या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे डॉ. बारी यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहिले. गाभारा प्रवेशावेळी पोलिसांचा स्वतंत्र एक पोलिस व्हिडीओ कॅमेरा घेऊन होता. त्यामधील चित्रीकरण पाहण्यात आले.
तृप्ती देसाई या गाभाऱ्यामध्ये जाताच श्रीपूजक श्रीश मुनिश्वर, सामाजिक कार्यकर्ते किसन कल्याणकर,जयकुमार शिंदे यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर इतर श्रीपूजक व महिलांनी त्यांच्या अंगावर हळद-कुंकु, शाई फेकून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅमेराबद्ध झाले आहे.
त्यानुसार धक्काबुक्की व मारहाण करणारे केदार मुनिश्वर, श्रीश मुनिश्वर, चैतन्य अष्टेकर, मयूर मुनिश्वर, निखिल शानभाग व त्यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे आदींचे नावे निष्पन्न झाली. त्यानंतर मंदिरात बंदोबस्तास असणारे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, साहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, स्मिता काळभोर, वैष्णवी पाटील, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर गायकवाड, गोपनीय विभागाचे सुहास पवार, अशोक निकम आदींचे जबाब घेतले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी डॉ. बारी यांना तपासकामात मदत केली. शुक्रवारी मध्यरात्री उशिरा मारहाणीतील नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पहाटे १.४३ वाजता गुन्हा दाखल झाला.
सरकारी फिर्याद अशी
पोलिस उपनिरीक्षक अमित व्यकंटेश मस्के यांनी दिलेली फिर्याद अशी, मी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. बुधवारी (दि. १३) अंबाबाई मंदिरात बंदोबस्तास होतो. सायंकाळी सात वाजता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई व त्यांच्यासोबत असलेल्या चार महिलांना अंबाबाई गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी आल्या असता श्रीपूजक केदार मुनिश्वर, श्रीश मुनिश्वर, चैतन्य अष्टेकर, मयूर मुनिश्वर, निखिल शानभाग व त्यांचे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे यांनी प्रवेशासाठी विरोध करून संगनमताने, गैरकायदेशीर एकजमाव करून त्यांना धक्काबुक्की केली व त्यांच्या दिशेने हळद-कुंकु व शाई फेकून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली तसेच बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की केली.(प्रतिनिधी)

Web Title: Seven people, including Shripad, have a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.