खंडणीप्रकरणी सातजणांना कोठडी
By admin | Published: July 26, 2014 12:05 AM2014-07-26T00:05:07+5:302014-07-26T00:37:06+5:30
हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी
कोल्हापूर : हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून ठार मारण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी काल, गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी माकडवाला वसाहतीमधील अटक केलेल्या सातजणांना आज, शुक्रवारी मुख्य न्यायाधीशांसमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयित दिलीप व्यंकटेश दुधाणे (वय ३१), किशोर दट्टाप्पा माने (२४), किरण दट्टाप्पा माने (२१), तानाजी गोपीनाथ मोरे (२९), करण राजू जाधव (२०), अर्जुन चंद्रभान पोवार (२५, सर्व रा. माकडवाला वसाहत), रोहन रघुनाथ पाटील (२९ रा. आपटेनगर) अशी त्यांची नावे आहेत. हॉटेल व्यावसायिक राजकुमार सुनील खोत (२३, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) यांचे आरोपींनी अपहरण करून त्यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी त्यांनी आपली सुटका करून घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात सातजणांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या सर्वांना अटक केली. आज त्यांना मुख्य न्यायाधीशांसमोर हजर करून संशयित आरोपी हे गुन्हेगार असून, त्यांना किमान दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी विद्या जाधव यांनी केली. यानुसार न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींना न्यायालयात आणल्यावर त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने न्यायालय आवारात गर्दी केली होती. (प्रतिनिधी)