Kolhapur: वानराचा हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, हिटणी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 02:05 PM2024-05-30T14:05:01+5:302024-05-30T14:05:34+5:30

गडहिंग्लज : रानातील वस्तीत मुलांसोबत खेळणाऱ्या बालकाचा वानराच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संकेत सुनील पाटील (७, रा. हिटणी, ता. गडहिंग्लज) ...

Seven year old boy killed in monkey attack in Hitni Gadhinglaj Kolhapur | Kolhapur: वानराचा हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, हिटणी येथील घटना

Kolhapur: वानराचा हल्ल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू, हिटणी येथील घटना

गडहिंग्लज : रानातील वस्तीत मुलांसोबत खेळणाऱ्या बालकाचा वानराच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संकेत सुनील पाटील (७, रा. हिटणी, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे हिटणीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, हिटणी येथील शेतवाडीतील वरदापगोळ-पाटील वसाहतीत सुनील रुद्रगोगंडा पाटील यांचे घर आहे. संकेत हा त्यांचा लहान मुलगा. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी वसाहतीमधील मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी संकेतही त्यांच्यासोबत खेळायला गेला होता. दरम्यान, एक वानर त्याठिकाणी अचानक आला. त्यामुळे घाबरलेल्या सर्व मुलांनी घराकडे धूम ठोकली.

परंतु, विसरलेला क्रिकेटचा बॉल आणण्यासाठी संकेत पुन्हा त्याठिकाणी गेला. त्यावेळी बाजूच्या गवतगंजीवर बसलेल्या वानराने थेट त्याच्या अंगावरच उडी मारली. त्यामुळे घाबरून तो किंचाळला आणि बेशुद्ध पडला.

दरम्यान, शेजारीच भांडी धुणाऱ्या महिलेच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांच्या आरडाओरडीने नातेवाईक व पुरुष मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने उपचारासाठी त्याला संकेश्वर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.

Web Title: Seven year old boy killed in monkey attack in Hitni Gadhinglaj Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.