सातवा वेतन मंजूर, अंमलबजावणीसाठी तारेवरच कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:52 PM2020-10-09T17:52:53+5:302020-10-09T17:55:04+5:30

Muncipal Corporation, kolhapurnews, Seventh pay कोल्हापूर महापालिकेला सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या तिजोरीवर यामुळे वर्षाला ४० कोटींचा बोजा पडणार आहे. याची तजवीज करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Seventh pay sanctioned, exercise on the wire for implementation | सातवा वेतन मंजूर, अंमलबजावणीसाठी तारेवरच कसरत

सातवा वेतन मंजूर, अंमलबजावणीसाठी तारेवरच कसरत

Next
ठळक मुद्देसातवा वेतन मंजूर, अंमलबजावणीसाठी तारेवरच कसरतमहापालिकेच्या तिजोरीवर वर्षाला ४० कोटींचा बोजा : वसुली वाढवावी लागणार

कोल्हापूर : महापालिकेला सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या तिजोरीवर यामुळे वर्षाला ४० कोटींचा बोजा पडणार आहे. याची तजवीज करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार पगार देण्याचा मागील वर्षी प्रस्ताव मंजूर झाला. महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे राज्य शासनाच्या मंजुरीसाठी एक वर्ष गेले. अखेर गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावावर सही केली आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला.

असे असले तरी महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, याची अंमलबजावणी करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गतवर्षी महापुरामुळे १५० कोटींची उत्पन्नात तूट; तर यंदा कोरोनामुळे वसुलीवर परिणाम यांमुळे तिजोरीत ठणठणाट आहे.

 

Web Title: Seventh pay sanctioned, exercise on the wire for implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.