सत्तर वर्षाच्या झाडात फुंकला प्राण, वृक्षप्रेमींच्या प्रयत्नामुळे झाले पुनर्रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:23 AM2021-05-13T04:23:43+5:302021-05-13T04:23:43+5:30

कोल्हापूर : इच्छाशक्तीपुढे गगनही ठेंगणे, याचीच प्रचिती कोल्हापुरात आली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये उन्मळून पडलेल्या ७० वर्षे ...

Seventy-year-old tree breathed life, replanted due to the efforts of arborists | सत्तर वर्षाच्या झाडात फुंकला प्राण, वृक्षप्रेमींच्या प्रयत्नामुळे झाले पुनर्रोपण

सत्तर वर्षाच्या झाडात फुंकला प्राण, वृक्षप्रेमींच्या प्रयत्नामुळे झाले पुनर्रोपण

Next

कोल्हापूर : इच्छाशक्तीपुढे गगनही ठेंगणे, याचीच प्रचिती कोल्हापुरात आली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडामध्ये प्राण फुंकण्यात वृक्षप्रेमींना यश आले आहे. ७० वर्षे वयाच्या या शंभर फुटी पिंपळाच्या झाडाचे शिवाजी विद्यापीठ परिसरात यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.

आठ दिवसापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये हे ७० वर्षे वयाचे शंभर फुटी पिंपळाचे झाड उन्मळून पडले होते. पर्यावरण संवर्धनावर काम करणाऱ्या कोल्हापुरातील वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेने आणि उद्योजक हसमुख शहा यांनी या झाडाचे पुनर्रोपण करण्याचा चंग बांधला. या झाडाच्या फांद्यांचा भार कमी करण्यात आला, त्यानंतर ते जेसीबी, क्रेन आणि ट्रेलरच्या साहाय्याने शिवाजी विद्यापीठ परिसरातील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक येथे आणून तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याचे पुनर्रोपण करण्यात आले. कोणत्याही शासकीय यंत्रणेशिवाय हे काम पूर्णत्वास गेले.

गेले तीन दिवस वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुड्ढे, सदस्य हसमुख शहा, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, कोल्हापूर अर्थमूव्हर्सचे अध्यक्ष रवींद्र(बापू) पाटील, उपाध्यक्ष संजय नाळे, संजय कसबेकर, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, उत्तम पाटील, केडीएमजीचे अभय देशपांडे, प्रा. खेडेकर, चिपळूणकर, तात्या गोवा वाला, अक्षय कांबळे, परितोष उरकुडे, सागर वासुदेवन, सतीश कोरडे, शैलेश टिकार, प्रसाद भोपळे, विकास कोंडेकर, शैलेश पोवार या वृक्षप्रेमींनी अथक परिश्रमानंतर शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये हा मोठा वृक्ष पुनर्स्थापित झाला.

--------------------------------------------

फोटो : 12052021-Kol-Tree Plantation01

फोटो ओळी : कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडाचे शिवाजी विद्यापीठ परिसरात जेसीबीच्या सहाय्याने यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.

फोटो : 12052021-Kol-Tree Plantation02

फोटो ओळी : कोल्हापुरातील उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडाचे वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या प्रयत्नाने शिवाजी विद्यापीठ परिसरात जेसीबीच्या सहाय्याने यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.

फोटो : 12052021-Kol-Tree Plantation03

फोटो ओळी : कोल्हापुरातील उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडाचे वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या प्रयत्नाने शिवाजी विद्यापीठ परिसरात जेसीबीच्या सहाय्याने यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.

===Photopath===

120521\12kol_2_12052021_5.jpg~120521\12kol_3_12052021_5.jpg~120521\12kol_4_12052021_5.jpg

===Caption===

फोटो : 12052021-Kol-Tree Plantation01फोटो ओळी : कोल्हापूरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या  झाडाचे शिवाजी विद्यापीठ परिसरात जेसीबीच्या सहाय्याने यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.~फोटो : 12052021-Kol-Tree Plantation02फोटो ओळी : कोल्हापूरातील उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडाचे वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या प्रयत्नाने शिवाजी विद्यापीठ परिसरात जेसीबीच्या सहाय्याने यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.~फोटो : 12052021-Kol-Tree Plantation03फोटो ओळी : कोल्हापूरातील उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडाचे वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या प्रयत्नाने शिवाजी विद्यापीठ परिसरात जेसीबीच्या सहाय्याने यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.

Web Title: Seventy-year-old tree breathed life, replanted due to the efforts of arborists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.