तारदाळात सांडपाणीप्रश्नी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर व ग्रामपंचायतवीर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:27 AM2021-04-23T04:27:25+5:302021-04-23T04:27:25+5:30
तारदाळमधील वाॅर्ड नंबर दोनमधील सांडपाणी पाणी बाहेर जाण्यासाठी सध्या कोणताच मार्ग नाही. त्यामुळे संपूर्ण गटारीचे पाणी व सांडपाणी एकत्र ...
तारदाळमधील वाॅर्ड नंबर दोनमधील सांडपाणी पाणी बाहेर जाण्यासाठी सध्या कोणताच मार्ग नाही. त्यामुळे संपूर्ण गटारीचे पाणी व सांडपाणी एकत्र गोळा होत तेथील नागरिकांच्या दारात, तसेच रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे परिसरात डासांची उत्पत्ती व भयंकर दुर्गंधी पसरत आहे. या सांडपाण्यातूनच तेथील नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग हातकणंगले, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, तहसीलदार यांना नागरिकांनी वेळोवेळी समस्यांची जाणीव करून दिली, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात व नागरिकांना होणारा नाहक त्रास दूर करावा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला.
यावर सरपंच यशवंत वाणी यांनी १५ व्या वित्त आयोगामधून येत्या दोन ते तीन दिवसांत काम चालू करण्याचे आश्वासन दिले आहे व जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी हा प्रश्न लवकरच निकाली लावू, असे सांगितले आहे. यावेळी भागातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.