विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन

By admin | Published: July 23, 2014 11:37 PM2014-07-23T23:37:15+5:302014-07-23T23:40:11+5:30

कोल्हापुरातील राजारामपुरीतील शिक्षकावर गुन्हा

Sexual behavior with the student | विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन

विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन

Next

कोल्हापूर : येथील राजारामपुरी विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी संशयित शिक्षकावर राजारामपुरी पोलिसांनी आज, बुधवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. संग्राम प्रकाश पाटील (रा. धामोड, ता. राधानगरी) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त पीडित विद्यार्थिनी राहत असलेल्या राजारामपुरी मातंग वसाहतीमध्ये समजताच शंभर ते दीडशे जणांचा जमाव शाळेवर चाल करून गेला. यावेळी संशयित शिक्षक पाटील हा पसार झाला होता. तेथून जमाव राजारामपुरी पोलीस ठाण्यासमोर आला. या ठिकाणी नराधम शिक्षकास त्वरित अटक करा, अशी मागणी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव होता.
याबाबत पोलिसांनी सांगितले, राजारामपुरी चौथ्या गल्लीमध्ये महापालिकेचे हे विद्यालय आहे. संशयित आरोपी संग्राम पाटील हा अनेक वर्षांपासून याठिकाणी शिक्षक आहे. तो गेल्या चार-पाच दिवसांपासून सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींना प्रश्नार्थी उत्तर सांगा, असे म्हणून त्यांच्याशी लगट करून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. आजही पीडित विद्यार्थिनीशी त्याने दुपारी अशाच प्रकारे वर्तन केले. हा त्रास सतत झाल्याने त्या विद्यार्थिनीने शाळा सुटल्यानंतर घरी येऊन आई-वडिलांना सांगितले. वडिलांनी परिसरातील नागरिकांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त तरुणांसह महिलांनी शाळेकडे धाव घेतली. शाळेत जाऊन त्यांनी शिक्षक पाटील याची चौकशी केली असता तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला. राजारामपुरीपासून ठिकाणासह धामोडकडे पोलिसांचे पथक तातडीने रवाना केले. राजारामपुरी विद्यालयाच्या दारात जमाव थांबून राहिल्याने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual behavior with the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.