संमेलनाध्यक्षपदी शफाअत खान यांची निवड

By Admin | Published: May 3, 2016 12:13 AM2016-05-03T00:13:27+5:302016-05-03T00:35:15+5:30

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

Shafaat Khan elected as president of the assembly | संमेलनाध्यक्षपदी शफाअत खान यांची निवड

संमेलनाध्यक्षपदी शफाअत खान यांची निवड

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर येथे २१ आणि २२ मे रोजी होणाऱ्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची निवड केल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक गणी आजरेकर यांनी दिली.
मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर यांच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृहात मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाला राज्यातून ५०० साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन हे संमेलन अतिशय साधेपणाने पार पाडण्यात येणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात तीन परिसंवाद, मराठी कविसंमेलन, बहुभाषिक कवी संमेलन, गजल मुशायरा याबरोबरच प्रकट मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संमेलनाच्या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन, नामवंतांचे छायाचित्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, व्यंगचित्र प्रदर्शन आणि कोल्हापुरी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुस्लिम मराठी साहित्य संमेलन २०१६ - कार्यकारिणी अशी : गणी आजरेकर निमंत्रक, सदस्य - प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण , बाबामोहम्मद आत्तार , प्रा. आय. जी. शेख , शिराज मुजावर , प्रा. डॉ. रफिक सूरज , एम. बी. शेख, महमदनिसार पठाण , डॉ. असिफ सौदागर , डॉ. सूरज चौगुले, समीर मुजावर (पत्रकार), राजू आत्तार, सिंकंदर जमाल , प्रा. फक्रुद्दीन पटेल सदस्य, नसीम जमादार.

Web Title: Shafaat Khan elected as president of the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.