जिल्हा परिषदेच्या १४ कर्मचाऱ्यांना शाहू पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:32+5:302021-06-26T04:18:32+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या १४ कर्मचाऱ्यांना सन २०२१-२२ चे राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर करण्यात ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या १४ कर्मचाऱ्यांना सन २०२१-२२ चे राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यथावकाश त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा या हेतुने दरवर्षी वर्ग ३ व वर्ग ४ मधील (ग्रामसेवक व शिक्षक सोडून) इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार देण्यात येतात. गोपनीय अहवालातील अतिउत्कृष्ट शेरे, समय सूचकता, प्रशासकीय कामकाजाची माहिती, निर्णयशक्ती, नियमांचे ज्ञान, सामाजिक व शैक्षणिक कलागुण, सचोटी व प्रामाणिकपणा या निकषांद्वारे ही निवड करण्यात येते.
या पुरस्कार निवडीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
चौकट
पुरस्कार विजेते कर्मचारी
१ अमित अप्पासाहेब माळगे,अधिक्षक पंचायत समिती, गडहिंग्लज
२ तानाजी बाबाजी सावंत, वरिष्ठ सहायक (विभागून)पंचायत समिती, चंदगड
३ प्रतिमा सर्जेराव पाटील, कृषी विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर
४ अमर ज्ञानदेव माळी कनिष्ठ सहायकप्रा. आ. केंद्र, उचगाव
५ दिलीप दिनकर काळे, वाहन चालक (विभागून) पंचायत समिती कागल
६ संभाजी आनंदा सारंग सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर
७ सचिन मधूकर आंबेकर परिचर, शिक्षण विभाग (प्राथ) जि. प. कोल्हापूर
८ बाळू मनोहर नाईक बाळू मनोहर सन २०२०-२१ निवड, परिचर प्रा. आ. केंद्र, पट्टणकोडोली
९ पंडित गोपाळ राठोड, विस्तार अधिकारी (कृषि)पंचायत समिती करवीर
१० बाजीराव शंकर मिसाळ, शाखा अभियंता उप विभाग (बांधकाम) पंचायत समिती, गगनबावडा
११ सुनीता चंद्रकांत नकाते, सहा. लेखाधिकारीपंचायत समिती हातकणंगले
१२ सुरेखा विठ्ठल कदम पर्यवेक्षीका एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोल्हापूर ग्रामीण पं. स. करवीर
१३ सचिन राजाराम पाटील पशुधन पर्यवेक्षक(विभागून) पशुवैद्यकीय दवाखाना, कोथळी
पंचायत समिती करवीर
१४ मालिक हानिफ कादरभाई वण्रोपचारक??????, पशुवैद्यकीय दवाखाना आजरा
पंचायत समिती, आजरा