शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ
By समीर देशपांडे | Updated: April 11, 2024 17:10 IST2024-04-11T17:08:05+5:302024-04-11T17:10:28+5:30
मंडलिकांना काही कळते का - उदयनराजे भोसले

शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ
कोल्हापूर : आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असे वादग्रस्त वक्तव्य महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केले आहे. नेसरी ता. गडहिंग्लज येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.
या सभेत बोलताना मंडलिक म्हणाले, माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग कुस्ती तरी कशी होणार अशी विचारणा करत मंडलिक यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंडलिकांना काही कळते का - उदयनराजे भोसले
दरम्यान संजय मंडलिकांना काही कळते का अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी एका दूरचित्रवाहिनीला प्रतिक्रिया दिली असून काँग्रसेचे नेते सतेज पाटील हे आता मंडलिक यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शाहू छत्रपती यांचा अपमान जनता सहन करणार नसून त्यांनी जाहीर माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे. एकूणच मंडलिकांचे हे वक्तव्य वादग्रस्त ठरले असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.