शाहू आघाडीची मंगळवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:20+5:302021-04-10T04:24:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १३) दुपारी चार वाजता विरोधी राजर्षि शाहू आघाडीची महत्त्वपूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. १३) दुपारी चार वाजता विरोधी राजर्षि शाहू आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. पॅनेल बांधणीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
‘गोकुळ’साठी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला निवडणूक स्थगितीबाबत सत्तारूढ गटाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे. इच्छुकांची प्रचार मोहीम जोरात सुरू आहे. त्याचबरोबर पॅनेल बांधणीबाबत दोन्ही गटाकडून अंतर्गत हालचाली सुरू आहेत. उमेदवारांची नावे २० एप्रिलला दुपारी दोन वाजता जाहीर होणार असली तरी बांधणी अगोदरच होणार आहे. त्यादृष्टीने सत्तारूढ व विरोधी आघाडीकडून सावध हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून, त्यानुसार पॅनेलची व्यूहरचना ठरवली जात आहे.
विरोधी राजर्षि शाहू आघाडीच्या नेत्यांची बैठक मंगळवारी दुपारी चार वाजता आयोजित केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलीक आदींच्या उपस्थित ही बैठक होत असून, येथे बऱ्यापैकी पॅनेल निश्चित केले जाणार आहे.