बंदी आदेश झुगारून समरजित घाटगे यांच्याकडून शाहू जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:03+5:302021-06-27T04:17:03+5:30
यावेळी समरजित घाटगे म्हणाले, उत्सवापासून मला नव्हे तर बहुजन समाजाला एकसंध होण्यापासून रोखण्याचा डाव करीत ...
यावेळी समरजित घाटगे म्हणाले, उत्सवापासून मला नव्हे तर बहुजन समाजाला एकसंध होण्यापासून रोखण्याचा डाव करीत होते. मात्र बहुजन समाजानेच त्यांचा हा डाव हाणून पाडला. पुढील वर्षापासून या ठिकाणी जयंती उत्सव करणार आहोत; त्यामुळे पुढच्या वर्षीचाही प्रतिबंध यावर्षीच करावा. म्हणजे बहुजन समाज पेटून उठेल आणि हा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात होईल. शाहू महाराजांचे कार्य इतके भव्यदिव्य आहे की ते संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारे आहे. हे कार्य जगासमोर आणता येईल, अशा आदर्श पद्धतीने त्यांची जयंती झाली पाहिजे.
जिल्ह्यासह बीड, औरंगाबाद, सांगलीहून आलेल्या शाहूप्रेमी नागरिकांनी धरणाच्या पायथ्याशी प्रशासनाचा हा बंदी आदेश झुगारून दिला. समरजित घाटगे व त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांच्या हस्ते पुतळ्याला जलाभिषेक केला. यावेळी महिला शववाहिकाचालक प्रिया पाटील यांचा सत्कार घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, राहुल देसाई, बाबासाहेब पाटील, दत्तात्रेय मेडशिंगे, दीपक शिरगावकर, सुभाष जाधव, सुमित चौगुले, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
राधानगरी धरणस्थळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास जलाभिषेक व पाणीपूजन करताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे व त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे.