शाहू महाराज यांच्या हस्ते रुकडीत मंदिराची पायाखुदाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:02+5:302021-08-29T04:25:02+5:30
रुकडी माणगाव : रुकडी कॅम्प परिसरात राजर्षी शाहू महाराज विश्रांतीसाठी असायचे. ते सकाळी महालाच्या उत्तरेस असलेल्या महादेवाची पिंड तर ...
रुकडी माणगाव : रुकडी कॅम्प परिसरात राजर्षी शाहू महाराज विश्रांतीसाठी असायचे. ते सकाळी महालाच्या उत्तरेस असलेल्या महादेवाची पिंड तर दक्षिणेस अंबाबाईचे मंदिर यांचे दर्शन घेऊन बाहेर पडायचे, हा इतिहास आहे. अशा ऐतिहासिक अंबाबाई मंदिराच्या जागी भव्य मंदिर उभारू, असे शाहू महाराज यांनी रुकडी येथे अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार पायाखुदाई प्रसंगी बोलले. अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील माने होते.
शाहू महाराज म्हणाले की,यांनी रुकडीसह पंचक्रोशीकडे राजर्षी शाहू महाराजांची विशेष ओढ होती. गावातील घोड्यांचा पागा, शिशमहल, हत्तीची साठमारी, अतिग्रेतील शाहू तलाव व माणगावातील परिषद या निमित्ताने हा परिसर नेहमी चर्चेत राहिला. कोल्हापूर संस्थानकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला १५० एकराचा परिसर देणगी रूपाने मिळाला. मंदिर समितीचे संयोजक अमितकुमार भोसले यांनी सुरू केलेल्या या कामास लागेल ती मदत कोल्हापूर संस्थानकडून करण्यात येईल, असे म्हणाले.
याप्रसंगी शाहू महाराज यांच्या हस्ते पायाखुदाई करण्यात आली. मंदिर समितीचे अध्यक्ष अमितकुमार भोसले, खा.धैर्यशिल माने, दलित मित्र अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील ,संजय कोळी, राजाराम बनकर, विकी लोखंडे, मनोज कोळी, विठ्ठल कुंभार, श्यामराव कुरणे, पप्पू मुरूमकर,राहुल बागडी, संजू देसाई, ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते.