शाहू महाराजांच्या विचारांची जपणूक गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:35+5:302021-06-27T04:16:35+5:30
म्हाकवेः छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या समता बंधुतेच्या मूलमंत्राचे जतन लोकनेते स्व. सदाशिवराव ...
म्हाकवेः छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या समता बंधुतेच्या मूलमंत्राचे जतन लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी हयातभर जोपासले. शाहू महाराज यांनी धरणाच्या उभारणीसह शेती, आरोग्य, शिक्षण या सर्वच क्षेत्रात योगदान दिले. त्यांच्या विचारांची आणि नीतीमूल्यांची जपणूक होऊन भावी पिढीसमोर आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत सदासाखरचे माजी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर यांनी व्यक्त केले.
हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना कार्यस्थळावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन माजी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक दिनकर बाळा पाटील, नंदकुमार घोरपडे, प्रशासन अधिकारी रावसाहेब बोंगार्डे, सातवेकर, भीमराव खोत, आनंदा माने यासह कर्मचारी, सभासद उपस्थित होते.
कँप्शन
हमिदवाडा कारखाना कार्यस्थळावर राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना बंडोपंत चौगुले, दिनकर पाटील, नंदकुमार घोरपडे आदी.