ग्राहकांच्या सेवेसाठी शाहू मिल्क मोबाईल ॲप लाँच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:33 AM2020-12-30T04:33:30+5:302020-12-30T04:33:30+5:30

शाहू दूध संघाची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत कागल : दूध व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. उच्च दर्जा व ...

Shahu Milk will launch a mobile app for customer service | ग्राहकांच्या सेवेसाठी शाहू मिल्क मोबाईल ॲप लाँच करणार

ग्राहकांच्या सेवेसाठी शाहू मिल्क मोबाईल ॲप लाँच करणार

googlenewsNext

शाहू दूध संघाची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

कागल : दूध व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. उच्च दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर शाहू दूध संघाने ‘शाहू ब्रँड’ म्हणून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी लवकरच शाहू मिल्क मोबाईल ॲप लाँच करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन शाहू मिल्क अँड ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या कार्यकारी संचालिका नवोदिता घाटगे यांनी केले.

येथील श्रीराम मंदिर सभागृहात झालेल्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. नवोदिता घाटगे पुढे म्हणाल्या, शाहू दूध संघाचे १९ प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ ७३ वेगवेगळ्या पॅकिंग साईजमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शाहू ॲग्रो या वेबसाईटद्वारे ऑनलाईन विक्री वर्षभर सुरू असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

समरजित घाटगे म्हणाले, शाहू दूध संघाच्या माध्यमातून दुधाबरोबर उपउत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. लवकरच बेकरी उत्पादने तयार करण्याचा मानस आहे.

विषयपत्रिकेचे वाचन व्यवस्थापक मानसिंग बोरगे यांनी केले. सभासदांनी सर्व विषय आवाजी मताने मंजूर केले. श्रद्धांजली ठराव वाचन सुनीलराज सूर्यवंशी यांनी केले. स्वागत संजय पाटील यांनी केले. युवराज पसारे यांनी आभार मानले.

फोटो कॅप्शन

येथे श्री छत्रपती शाहू मिल्क अँड ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारी संचालिका नवोदिता घाटगे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर समरजितसिंह घाटगे व संचालक उपस्थित होते.

Web Title: Shahu Milk will launch a mobile app for customer service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.