शाहू समाधीप्रश्नी उद्या व्यापक बैठक, जिल्हाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:47 AM2019-05-30T11:47:14+5:302019-05-30T11:51:23+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी उद्या, शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात व्यापक बैठक आयोजित करून त्यामध्ये सामंजस्यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शाहू भक्तांच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, समाधीस्थळाबाबतचा निर्णय समन्वयातून घ्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले.

Shahu Samadhi Prashna tomorrow's comprehensive meeting, District Delegation delegation assurance | शाहू समाधीप्रश्नी उद्या व्यापक बैठक, जिल्हाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाचे आश्वासन

कोल्हापुरातील नर्सरी बागेत होत असलेल्या शाहू समाधीस्थळाच्या बांधकामावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्या, अशा मागणीचे निवेदन शाहू भक्तांच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देशाहू समाधीप्रश्नी उद्या व्यापक बैठक जिल्हाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाचे आश्वासन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी उद्या, शुक्रवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात व्यापक बैठक आयोजित करून त्यामध्ये सामंजस्यातून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शाहू भक्तांच्या शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, समाधीस्थळाबाबतचा निर्णय समन्वयातून घ्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले.

कोल्हापुरातील शाहू भक्तांचे एक शिष्टमंडळ बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी देसाई यांना भेटले व शाहू समाधीस्थळाच्या बांधकामाबाबत निवेदन दिले. आम्ही शाहू -फुले-आंबेडकरांचा वारसा चालविणारे कोल्हापूरकर आहोत; त्यामुळे दोन जातींत तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. राजर्षी शाहू महाराज यांनी स्वत: आपली समाधी दलित समाजाच्या वसाहतीशेजारी असावी, असे सांगितले
होते; त्यामुळेच ही समाधी नर्सरी बागेत होत आहे.

शाहू समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी सिद्धार्थनगरातील कार्यकर्त्यांनी खासदार संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार)

तसेच येथे शाहू महाराज यांचे वडील चौथे शिवाजी, मातोश्री आनंदीबाई यांची समाधी तर पुत्र प्रिन्स शिवाजी व करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराराणी यांची मंदिरे तेथे आहेत. यापूर्वी ताराराणी यांची संगमरवरी दगडाची मूर्ती कोणी अज्ञाताने फोडली आहे; त्यामुळे हा परिसर सुरक्षित राहिलेला नाही. म्हणूनच संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे दिलीप देसाई यांनी सांगितले.

या शिष्टमंडळात सतीशचंद्र कांबळे, पंडितराव सडोलीकर, अशोक पोवार, रमेश मोरे, अजित सासणे, अशोक रामचंदाणी, भगवान काटे, महादेव पाटील, फिरोजखान उस्ताद, विनोद डुणुंग, किसन कल्याणकर, बी. एल. बरगे, चंद्रकांत यादव, रणजित गावडे, संभाजी जगदाळे, भारत घोंगडे, प्रकाश पाटील, राजू माने, विजय पोळ, गुरूप्रसाद माळकर, अमित आडसुळे, स्वप्निल पार्टे यांचा समावेश होता.

समन्वयातून मार्ग काढा : खा. संभाजीराजे

दरम्यान, सिद्धार्थनगरातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सायंकाळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. संभाजीराजे जिल्हाधिकाºयांसमवेत शिवाजी पुलाची पाहणी करण्याकरिता गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने सिद्धार्थनगराकडील बाजूस प्रवेशद्वार करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल व तेथील व्यायामशाळा हलवू नये, यासह अन्य काही मागण्या केल्या. तेव्हा संभाजीराजेंनी जिल्हाधिकाºयांना व्यापक बैठक घेऊन समन्वयातून मार्ग काढावा, असे सांगितले. शिष्टमंडळात शहाजी कांबळे, संजय माळी, बाळासाहेब भोसले, भारत रुईकर, वसंत लिंगनूरकर, सुशील कोल्हटकर, अमोल कांबळे यांचा समावेश होता.

 

Web Title: Shahu Samadhi Prashna tomorrow's comprehensive meeting, District Delegation delegation assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.