शाहू कारखाना सभासदांना देणार मोफत सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:32+5:302021-06-05T04:17:32+5:30
मागील वर्षी अचानकपणे आलेल्या कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर कारखान्याने फास्ट ओ क्लीन नावाचे उच्च दर्जाचे सॅनिटायझर निर्मिती करण्यास सुरुवात ...
मागील वर्षी अचानकपणे आलेल्या कोविड -१९च्या पार्श्वभूमीवर कारखान्याने फास्ट ओ क्लीन नावाचे उच्च दर्जाचे सॅनिटायझर निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्याला बाजारात चांगली मागणी आहे. आत्ता दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यासाठीच्या प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सॅनिटायझरचा वापर अत्यावश्यक आहे. मात्र, बाजारामध्ये त्याचा तुटवडा असून दरही जास्त आहेत. त्यामुळे सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन व गैरसोय होऊ नये म्हणून कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सभासदांना प्रत्येकी एक लिटर मोफत व त्यापुढे सभासदांना सॅनिटायझर हवे असल्यास प्रतिलिटर १०० रुपये या सवलतीच्या दरात सॅनिटायझर पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विभागीय शेती कार्यालयांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी सभासदांनी त्यांचे स्मार्ट कार्ड सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
चौकट
कोरोना काळात सामाजिक बांधिलकी
कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कारखान्याने कोविड रुग्णालय सुरू केले आहे. तसेच रुग्णवाहिका सुरू केली आहे. आता सभासदांना मोफत व इतरांना सवलतीच्या दरात सॅनिटायझर पुरवठा करून शाहू साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.