शाहूंच्या शिक्षण कायद्याची निघणार पुस्तिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:27 AM2017-07-22T01:27:42+5:302017-07-22T01:28:14+5:30

सप्ताहही साजरा करणार : राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

Shahu's Law of Education Law | शाहूंच्या शिक्षण कायद्याची निघणार पुस्तिका

शाहूंच्या शिक्षण कायद्याची निघणार पुस्तिका

googlenewsNext

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी शाहू पुरस्कार विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सुचविल्याप्रमाणे शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक कायद्याला २१ सप्टेंबर २०१७ला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राजर्षी शाहू शिक्षण क्रांतिदिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी त्यांनी केलेल्या शिक्षणविषयक कायद्याची पुस्तिका प्रसिद्ध करण्याचेही ठरविण्यात आले तसेच यानिमित्त सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
दि. २६ जून २०१७ रोजी शाहू पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. माशेलकर यांनी हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी याबाबत स्वतंत्र पत्र पाठवून याबाबतचे उपक्रमही
सुचविले होते. याबाबतचे वृत्त गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या या बैठकीत नियोजित उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या दिवशी शिक्षणविषयक परिसंवाद घेण्यात येणार असून या विचारमंथनातून काढण्यात आलेले निष्कर्ष शासनाला सादर करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक या कायद्याची माहिती देणारी जी पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे; त्याला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रस्तावना देणार आहेत. या बैठकीला महापौर हसिना फरास, ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. अशोक चौसाळकर आदी उपस्थित होते.


निष्कर्ष शासनास देणार
जे वैचारिक मंथन होणार आहे; त्याबाबतचे निष्कर्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्या बाबतही यावेळी विचार झाला.

Web Title: Shahu's Law of Education Law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.