शाहूवाडी चुरशीने सुमारे ८० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:17+5:302021-01-16T04:29:17+5:30
मतदान झाले. केंद्रावर सकाळी ११.०० वाजेपर्यंत ३५ टक्के, दुपारी मतदानासाठी काही केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दुपारी ४.०० वाजेपर्यंत ...
मतदान झाले.
केंद्रावर सकाळी ११.०० वाजेपर्यंत ३५ टक्के, दुपारी मतदानासाठी काही केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दुपारी ४.०० वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाले. धनगरवाडे व वाड्यावस्त्यांवरून मतदारांना आणण्यासाठी रिक्षा, जीप व दुचाकीची व्यवस्था करण्यात आली होती. मतदानासाठी मुंबईहून खास ट्रॅव्हल्स आल्या होत्या.
३३ ग्रामपंचायतीच्या २१५ जागेसाठी ४५१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.आता मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. शेवटच्या क्षणांपर्यंत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी चुरस सुरू होती. गावगाडा आपल्या गटाच्या ताब्यात ठेवण्यासाठी गटप्रमुख कामाला लागले होते. मोठ्या प्रमाणात मतदारांना आर्थिक रसद पुरवली जात होती.
मुंबईचे चाकरमानी मतदानासाठी दाखल
शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश मतदार उदर निर्वाहासाठी मुंबईत आहेत. त्यांना मतदानासाठी आणण्यासाठी खासगी वहानाची व त्यांच्या जेवणाची सोय केली होती.
..................
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही गावातील महिलांनी एकसारख्या साड्या परिधान करून मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला .
मतदारांना आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था
शाहूवाडी तालुक्यात दळणवळणाची अपुरी सुविधा असल्यामुळे उमेदवारांनी मतदारांना मतदान करण्यासाठी खासगी गाड्यांची सोय करून त्यांना नाश्तादेखील पुरविला होता.