शाहुवाडीत भात, उसाचा झाला चिखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:35+5:302021-07-27T04:24:35+5:30
पुराच्या पाण्याने नदीकाठची ऊस,भात शेती गेली आठ दिवस पाण्याखाली आहे. घरांची पडझड, भूस्खलन झाले आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून ...
पुराच्या पाण्याने नदीकाठची ऊस,भात शेती गेली आठ दिवस पाण्याखाली आहे. घरांची पडझड, भूस्खलन झाले आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहेत. तालुक्यातील २ हजार ५०० शेतकऱ्यांची ४५० हेक्टरवरील भात, २५० हेक्टर वरील ऊस पिके बाधित झाली आहेत. सुमारे तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. तीन नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे १२०१ कुटुंबांना व ४ हजार २३० नागरिकांना स्थलांतरित केले आहे. ४ हजार ५६४ जनावरांना स्थलांतरीत केले आहे. ३ तीन ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. २१ गावातील डोंगरात भूस्खलन झाले आहे. बारा गावात १२८ घरांची अंशत: पडझड झाली असून १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गवरील आंबा घाटात भूस्खलन झाल्यामुळे रस्ता बंद आहे. लव्हाळा ते वाकोली रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. पुराच्या पाण्यामुळे १५ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता.
२६ शाहुवाडी
शाहुवाडी तालुक्यात महापुराने ऊस जागीच कुजला आहे.