यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:35 PM2022-05-30T19:35:06+5:302022-05-30T19:45:30+5:30

शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले.

Shahuwadi's Ashish Patil ranks 563rd and Kagal Swapnil Mane ranks 578th in UPSC | यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश

यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश

googlenewsNext

कोल्हापूर : यूपीएससी फायनलचा निकाल आज, सोमवारी जाहीर झाला. यानिकालात देशात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा देशात पहिली आली आहे. तर, महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. कोल्हापुरातूनही दोघांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. देशात यंदा यूपीएससीमध्ये एकूण ७४९ उमेदवार यशस्वी ठरले आहेत.

शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले. आशिष यांनी ५६३ वी तर स्वप्नील माने यांनी ५७८ वी रँक मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कागलमधील स्वप्नील माने याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्याने गारगोटी येथील आयसीआरई महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातून डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात बी टेक पूर्ण केले. बी टेक नंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. अन् त्याने देशात ५७८ वी रँक मिळवत यश संपादन केले.

तर, शाहुवाडी तालुक्यातील साळशी येथील आशिषने हे यश दुसऱ्याच प्रयत्नात प्राप्त केले आहे. आशिषचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झाले आहे. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे पूर्ण झाले. पुढे पुण्यातच अकरावी व बारावी ते इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन मधून इंजिनिरिंग पूर्ण केले. यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. अन् त्याने देशात ५६३ वी रँक मिळवत यश संपादन केले.

Web Title: Shahuwadi's Ashish Patil ranks 563rd and Kagal Swapnil Mane ranks 578th in UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.