शैलेश बलकवडे यांना भारत सरकारचे असाधारण असूचना कुशलता पदक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:22 AM2021-01-01T11:22:24+5:302021-01-01T11:29:30+5:30
Police Kolhapur- गडचिरोली या नक्षलवादी भागात दोन वर्षांत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षलवाद्याविरुद्ध केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारच्या गृहविभागाने घेतली. त्याबद्दल केंद्रीय गह विभागाच्यावतीने त्यांना "असाधारण असूचना कुशलता पदक'''' जाहीर झाले. तसेच राज्य शासनानेही त्यांच्या खडतर सेवेबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले. याबद्दल त्यांच्यावर पोलीस दलासह सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होता.
कोल्हापूर : गडचिरोली या नक्षलवादी भागात दोन वर्षांत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षलवाद्याविरुद्ध केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारच्या गृहविभागाने घेतली. त्याबद्दल केंद्रीय गह विभागाच्यावतीने त्यांना "असाधारण असूचना कुशलता पदक'''' जाहीर झाले. तसेच राज्य शासनानेही त्यांच्या खडतर सेवेबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले. याबद्दल त्यांच्यावर पोलीस दलासह सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होता.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २०१८ ते २०२० या कालावधीत गडचिरोली पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळली. त्यांनी तेथे नक्षलवादावर अंकूश ठेवण्यात यश मिळविले. घातपातीच्या तयारीतील नक्षलींचे १० कँप उद्ध्वस्त केले होते. यावेळी चकमकीत २० नक्षली ठार करण्यात पथकाला यश मिळाले होते. हिंसक कृत्य करण्याच्या तयारीतील ५३ नक्षलींना अटक केली. दोन वर्षांत ४५ नक्षलींनी आत्मसमर्पण केले. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत झाल्या.
सुमारे चार कोटींचा मद्यसाठा जप्त केला. किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे ३० गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला. बलकवडे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना केंद्रीय गृह खात्याचा असाधारण असूचना कुशलता व राज्य शासनाचे ह्यविशेष सेवाह्ण पदक जाहीर झाले.
पन्नास टक्के कामगिरी दोन वर्षांत
गडचिरोलीच्या इतिहासात चाळीस वर्षांत जी उल्लेखनीय कामगिरी झाली, त्याच्या पन्नास टक्के कामगिरी पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत झाल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे.
नक्षली भागात पोलीस अधीक्षक बलकवडे यांची विशेष कामगिरी
- १० : नक्षलींचे कँप उद्ध्वस्त
- २० : पोलिसांशी चकमकीत नक्षली ठार
- ५३ : नक्षली अटक
- ४३ : नक्षली आत्मसमर्पण