महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 02:16 PM2019-04-17T14:16:56+5:302019-04-17T14:18:25+5:30
अहिंसेचा संदेश देणाºया भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे करण्यात आला.
कोल्हापूर : अहिंसेचा संदेश देणाºया भगवान महावीर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते महावीर उद्यान, नागाळा पार्क येथे करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच फिरायला येणाºया नागरीकांनी उद्यानात श्रमदान करुन स्वच्छता केली.
या मोहिमे अंतर्गत बुधवारी सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत महावीर उद्यान येथे श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये महावीर उद्यानाची तसेच सभोवतालच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यानंतर आडगळीच्या ठिकाणी औषध फवारणी करुन डीडीटी पावडर मारण्यात आली. माहिमेमध्ये महापालिकेच्या सुमारे 450 हून अधिक अधिकारी, कर्मचा-यांनी सहभाग घेतला. महावीर उद्यानामध्ये उपस्थित असलेल्या निसर्गप्रेमी नागरीकांनीही स्वच्छता मोहिमेत उत्फुर्तपणे सहभाग नोंदवून महापालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
उपस्थित नागरीकांच्यावतीने आयुक्त कलशेट्टी यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निसर्ग व आरोग्य याचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी स्वच्छतेची कास धरावी, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले. नागरीकांनी शहरातील उद्यानांविषयी बाजू मांडून महापालिकेने अशाच प्रकारे सर्व उद्यानांची स्वच्छता सेवा मोहिम राबवावी व उद्यानानमधील कमतरतांची पुर्तता करुन घेणेसाठी नागरीकांचीही सहभाग घ्यावा, अशी विनंती आयुक्तांनी केली.
स्वच्छता मोहिमेत अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रशासन अधिकारी शंकर यादव, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, उपशहर अभियंता आर. के. जाधव, रमेश मस्कर, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, वर्कशॉप प्रमुख सचिन जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबळे, एलबीटी अधिकारी सुनिल बिद्रे, विजय वणकुद्रे यांच्यासह मोठया प्रमाणात अधिकारी, विभागीय आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक, आरोग्य सफाई, पवडी, बागा विभागाकडील कर्मचारी यांनी भाग घेतला.
कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी महावीर जयंतीचा औचित्य साधून महावीर उद्यानातून ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेचा प्रारंभ केला. या मोहिमेत आयुक्तांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरीकांनी भाग घेतला.