भाजपच्या बैठकीमध्ये शौमिका-अमलची हजेरी-: ‘मातोश्री’वर माझी तक्रार जाता कामा नये - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:54 AM2019-03-16T00:54:51+5:302019-03-16T00:55:43+5:30

एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा

Shameika Ammal's attendance at BJP meeting: I should not complain about 'Matoshree' - Guardian Minister | भाजपच्या बैठकीमध्ये शौमिका-अमलची हजेरी-: ‘मातोश्री’वर माझी तक्रार जाता कामा नये - पालकमंत्री

कोल्हापुरातकोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महेश जाधव, शौमिका महाडिक, अमल महाडिक, हिंदुराव शेळके, रवी अनासपुरे, बाबा देसाई, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देलोकसभेसाठी व्यूहरचना

कोल्हापूर : एक मताने १९९८ मध्ये वाजपेयी सरकार पडले, सात जागा कमी पडल्याने २००४ मध्ये भाजप सरकार स्थापन करता आले नाही; त्यामुळे एक आणि एक जागा महत्त्वाची असून, शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करा. आपण कमी पडलो म्हणून माझी तक्रार ‘मातोश्री’वर जाणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले.

येथील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्टÑ संघटनमंत्री रवी अनासपुरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, आदी प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी, चंदगड, कागल विधानसभा मतदार संघनिहाय पालकमंत्री पाटील यांनी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन केले.
युती झाल्याने कोणी मनात संभ्रम बाळगण्याची गरज नाही. आपली दिशा स्पष्ट असून, युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचे आहे; यासाठीकार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करावे. प्रचार करताना यंत्रणेबाबत मित्रपक्षाला तसदी न देता, त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नका. स्वत:ची यंत्रणा राबवा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, हेमंत कोलेकर, राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, आर. डी. पाटील, अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, मामा कोळवणकर, मारुती भागोजी, अशोक लोहार, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, अनिल देसाई, नगरसेवक विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, संभाजी जाधव, किरण नकाते, विजयसिंह खाडे, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता कुंभार, गीता गुरव, भाग्यश्री शेटके उपस्थित होते.

कुणाच्या भागात किती मते चेक करणार

ही निवडणूक युतीसाठी महत्त्वाची आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; त्यामुळे कोल्हापुरातून संजय मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. कोणत्याच बाबतीत आपण कमी पडता कामा नये. निवडणुकीनंतर कोणत्या भागातून किती मतदान मिळाले, याचा आढावा नगरसेवकांसह जिल्हा परिषद सदस्यांकडून घेतला जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.


 

Web Title: Shameika Ammal's attendance at BJP meeting: I should not complain about 'Matoshree' - Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.