शौमिकातार्इंनी सांगितला ‘महाडिक-शिंदे’चा वसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:24 AM2017-09-20T00:24:46+5:302017-09-20T00:27:26+5:30

गडहिंग्लज : महाडिकसाहेबांच्या पहिल्या विधान परिषद निवडणुकीच्या विजयात शिंदे साहेबांचा मोठा वाटा होता.

Shamikataarai told 'Mahadik-shinde' fat! | शौमिकातार्इंनी सांगितला ‘महाडिक-शिंदे’चा वसा !

शौमिकातार्इंनी सांगितला ‘महाडिक-शिंदे’चा वसा !

googlenewsNext
ठळक मुद्देजाणकारांच्या भुवया उंचावल्या : ‘अमल’ कार्यपद्धतीने स्वातीताई ‘प्रभावित’ ! एकमेकांवरील विश्वासाचा ‘महाडिक-शिंदे’ वसा आणि वारसा आपणही जपूयाअमल महाडिक यांच्या मध्यस्तीने शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळविण्यासाठी स्वातीतार्इंचे प्रयत्न सुरू

राम मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : महाडिकसाहेबांच्या पहिल्या विधान परिषद निवडणुकीच्या विजयात शिंदे साहेबांचा मोठा वाटा होता. त्यानंतरही त्यांच्यावर ज्या-ज्यावेळी गुलाल पडला त्यामध्येही त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. अलीकडील अटीतटीच्या निवडणुकीतही त्यांनी महाडिक साहेबांनाच साथ दिली. एकमेकांवरील विश्वासाचा ‘महाडिक-शिंदे’ वसा आणि वारसा आपणही जपूया, असे आवाहन भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी येथील जनता दलाच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरींना जाहीरपणे केले. त्यामुळे जाणकारांबरोबरच उपस्थित सर्व नागरिकांच्याही भुवया काहीशा उंचावल्या.
निमित्त होतं... गडहिंग्लज नगरपालिकेने विकसित केलेल्या बगीचा लोकर्पण सोहळ्याचं. त्यानिमित्ताने शौमिकाताई पहिल्यांदाच गडहिंग्लजला आल्या होत्या. त्यांनी आपल्या भाषणात गडहिंग्लजला येण्याची तीन कारणे सोदाहरण सांगितली. त्यातील पहिले कारण म्हणजे, पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी गडहिंग्लज पालिका कृतिशील आहे. दुसरे म्हणजे, ‘शिंदे-महाडिक’ यांच्यातील ऋणानुबंध आणि तिसरे म्हणजे, १८ वर्षांपूर्वी महाडिक युवा मंच जिल्ह्यात सर्वप्रथम स्थापन करणारा अमोल हातरोटे हा तरुण कार्यकर्ताही इथलाच. या तिन्ही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करून त्यांनी महाडिक शैलीच्या खास भाषणाची झलकच दाखवून दिली.
‘स्वच्छ-सुंदर’ गडहिंग्लजचा नावलौकिक टिकविण्यासाठी नागरिकांना आवाहन करतानाच बहुउद्देशीय सभागृहासह अनेक प्रलंबित विकासकामे पाच वर्षांत मार्गी लावायची आहेत. त्यासंदर्भात आमदार अमल महाडिक यांनी आमची मुख्यमंत्र्यांशी खास भेट व चर्चा घडवून आणली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आपण प्रभावित झालो, असे स्वातीतार्इंनी प्रास्ताविकातच जाहीरपणे सांगून टाकले. त्यानंतर शौमिकातार्इंनी विश्वासाच्या राजकारणामुळेच गडहिंग्लज पालिका बरीच वर्षे शिंदेच्याकडे असल्याचे नमूद करून स्वातीतार्इंचे तोंडभरून कौतुकही केले. महाडिक-शिंदेमधील ऋणानुबंधाचा संदर्भ देत हा ‘वारसा’ जपूया, असे आवाहन करायलाही त्या विसरल्या नाहीत. त्यामुळेच गडहिंग्लजकर बुचकळ्यात पडले आहेत.

गडहिंग्लजसाठी ‘महाडिकां’ची मध्यस्थी !
दोन वर्षांपूर्वी नूल येथील एका कार्यक्रमात श्रीपतराव शिंदे यांना उद्देशून बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादांनी स्वातीतार्इंना आमच्याबरोबर पाठवा, असे आवाहन जाहीरपणे केले होते. दरम्यान, गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी जनता दलाशी युती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेंनी मुश्रीफांशी ‘दोस्ती’ केली. त्यामुळे गडहिंग्लजच्या नाट्यगृहासाठी दिलेले पाच कोटी शासनाने परत घेतले. त्यानंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता अबाधित राखलेल्या जनता दलाबरोबर भाजपची आघाडी झाली असतानाही अपेक्षित निधी गडहिंग्लजला मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच अमल महाडिक यांच्या मध्यस्तीने शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळविण्यासाठी स्वातीतार्इंचे प्रयत्न सुरू असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले.

Web Title: Shamikataarai told 'Mahadik-shinde' fat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.