Kolhapur: इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन बँकेत साडेतीन कोटींचा अपहार, अध्यक्षासह चौदाजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:46 PM2023-08-17T15:46:01+5:302023-08-17T15:46:55+5:30

स्वत: अध्यक्ष व त्यांच्या पत्नी यांच्या नावे नियमबाह्य कर्ज देणे अशी अनेक नियमबाह्य कामे केल्याचे आढळले

Shankarao Pujari Newan Bank in Ichalkaranji embezzled 3.5 crores, 14 people arrested including the chairman | Kolhapur: इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन बँकेत साडेतीन कोटींचा अपहार, अध्यक्षासह चौदाजणांना अटक

Kolhapur: इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन बँकेत साडेतीन कोटींचा अपहार, अध्यक्षासह चौदाजणांना अटक

googlenewsNext

अतुल आंबी

इचलकरंजी : येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बॅँकेत पदाचा दुरूपयोग करत नियमबाह्य कर्ज वाटप करून तब्बल तीन कोटी ५८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष, त्याची पत्नी व शाखाधिकारी, आदींसह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी  प्रशासक धोंडीराम आकाराम चौगुले (रा. राजारामपुरी कोल्हापूर) यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी अध्यक्ष प्रकाश शंकरराव पुजारी याच्यासह चौदाजणांना अटक केली आहे.

अध्यक्ष प्रकाश व त्यांची पत्नी कांचन (दोघे रा. आवाडे अपार्टमेंट मागे), शाखाधिकारी मलकारी लवटे (रा. धनगर गल्ली, गावभाग), कर्ज विभागप्रमुख राजेंद्र गणपती जाधव (रा. सांगली नाका), सिनियर मॅनेजर रावसाहेब महादेव जावळे (रा. राजेंद्रनगर कोल्हापूर), शाखाधिकारी राजेंद्र जयपाल मौर्य (रा. सांगली नाका), पासिंग आॅफिसर सुरेखा जयपाल बडबडे (रा. बिग बाजारजवळ), ज्युनिअर आॅफिसर मारुती कोंडीबा अनुसे (रा. माले मुडशिंगी), शिपाई अभिजित मल्हारी सोलगे (रा. माणगांवकर बोळ), कॅशियर वैभव बाळगोंडा गवळी (रा. बरगे मळा), क्लार्क निलेश शिवाजी दळवी (रा. लिगाडे मळा),

कॅशियर रोहित बळवंत कवठेकर (रा. निंबळक ता. तासगांव), क्लार्क सजेर्राव महादेव जगताप (रा. येडेमच्छिंद्र जि. सांगली), आयटी मॅनेजर शेखर नारायण खरात (रा. सांगलीवाडी),  शाखाधिकारी प्रभाकर बाजीराव कदम (रा. पलूस ता. सांगली), शाखाधिकारी राहुल प्रकाश पाटील (रा. जयसिंगपूर), शाखाधिकारी विकास वसंत साळुंखे (रा. राजाराम ता. तासगांव), क्लार्क सारीका निलेश कडतारे (रा. सरनोबतवाडी), शिपाई विजय परशराम माळी (रा. ढोरवेस तालीम), सुरेखा बडबडे, सजेराव जगताप, राहुल पाटील, सारीका कडतारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अपहाराबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रशासक चौगुले यांनी बॅँकेच्या सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ सालाचे लेखापरीक्षण केले. त्यामध्ये बॅँकेमध्ये कर्जाची थकबाकी असताना पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाची परवानगी न घेता नियमबाह्यपणे कर्ज वाटप केले. त्यामध्ये खाते बनावट निरंक दाखले देणे, ते खरे म्हणून वापरणे, कर्जाला बेकायदेशीर सूट देणे, बनावट व्हौचर देणे, नातेवाइकांना कर्ज देणे, स्वत: अध्यक्ष व त्यांच्या पत्नी यांच्या नावे नियमबाह्य कर्ज देणे अशी अनेक नियमबाह्य कामे केल्याचे आढळले आहे. त्या माध्यमातून सन २०२०-२१ मध्ये एक कोटी ५० लाख ३७ हजार आणि सन २०२१-२२ मध्ये दोन कोटी ७ लाख ९८ हजार असा एकूण तीन कोटी ५८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केला. तसेच हा प्रकार मुख्य शाखा, सहकारनगर, पलूस आणि इस्लामपूर शाखेत घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Shankarao Pujari Newan Bank in Ichalkaranji embezzled 3.5 crores, 14 people arrested including the chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.