माझ्या उमेदवारीचा निर्णय शरद पवारच घेणार : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:58 PM2018-06-07T23:58:47+5:302018-06-07T23:58:47+5:30

आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. हसन मुश्रीफ आमचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये माझ्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली आहे माहिती नाही

Sharad Pawar will decide my candidature: Dhananjay Mahadik | माझ्या उमेदवारीचा निर्णय शरद पवारच घेणार : धनंजय महाडिक

माझ्या उमेदवारीचा निर्णय शरद पवारच घेणार : धनंजय महाडिक

googlenewsNext

कोल्हापूर : आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत. हसन मुश्रीफ आमचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये माझ्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली आहे माहिती नाही. मात्र, माझ्या उमेदवारीबाबत पवारसाहेबच निर्णय घेतील आणि तो मला बंधनकारक असेल, अशी स्पष्ट भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली.
महाडिक यांना सलग दुसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे मला हा पुरस्कार दुसºयांदा मिळाल्याचे सांगून त्यांनी जनतेने ही संधी दिल्याबद्दल आभारही मानले. पी.आर.एस. इंडिया, प्राईम पॉर्इंट फौंडेशन, प्रो सेन्स आणि केंद्रीय संसदरत्न समितीच्यावतीने देशातील सर्व खासदारांच्या संसदेतील कामांचे मूल्यमापन करून हा पुरस्कार देण्यात येतो. संसदेतील कामकाजात सहभाग, विविध प्रश्नांची मांडणी, हे प्रश्न सोडविण्यासाठी केलेला पाठपुरावा, नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याची तयारी, संसदेत उपस्थित केलेले ९७० प्रश्न, ४६ चर्चांमध्ये घेतलेला सहभाग, सादर केलेली ६ खासगी विधेयके, लोकहितासाठी कायदे बदलासाठीचा आग्रह याची दखल घेत आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याचे महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग, विमानतळ, पासपोर्ट सुविधा, रस्त्यांची कामे, ईएसआय हॉस्पिटल, बास्केट ब्रिज हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करुन कोट्यवधीचा निधी मंजूर केल्याचे महाडिक यांनी सांगीतले. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, अभिजित मगदूम, पृथ्वीराज महाडिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मी राष्टवादीचाच !
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तुम्हाला केंद्रीय मंत्री करतो,’ असे म्हटले होते याची आठवण करून दिली असता महाडिक म्हणाले, प्रत्येक पक्षाला काम करणारे, धडपडणारे उमेद्वार हवे असतात. त्यादृष्टीने ते सन्मान देण्यासाठी म्हणून ते बोलले होते. मात्र, मी राष्ट्रवादीचा खासदार आहे आणि आमच्या पक्षात पवारसाहेब जो निर्णय देतील तो मान्य केला जातो, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
उद्या चेन्नई येथे  पुरस्कार वितरण
उद्या चेन्नई येथे आय.आय.टी मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीमध्ये, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

मंगळवारपासून बिदर रेल्वे सुरू होणार
येत्या मंगळवारपासून कोल्हापूर-बिदर रेल्वे सेवा सुरू होत असल्याचे सांगून महाडिक म्हणाले, सध्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनशी संबंधित ८० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. पुणे, मिरज आणि मिरज कोल्हापूर दुहेरीकरणाची कामे मंजूर असून हे दुहेरीकरण झाल्याशिवाय कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला चालना मिळणार नाही म्हणूनच त्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.



 

Web Title: Sharad Pawar will decide my candidature: Dhananjay Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.